नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांच्यामार्फत दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) पदांच्या एकूण ११४ जागा भरण्यासाठी शनिवार ९ सप्टेंबर २०२३ रोजी औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर केंद्रांवर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि दंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२२ ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> जिल्हाधिकारी साहेब जरा कोराडीतील विहिरीचे पाणी पिऊन बघा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ११४ जागांसाठी जाहिरात आली असून इच्छुक उमेदवारांना १३ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत. दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि दंडाधिकारी (प्रथम वर्ग) पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असून एमपीएससीच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून या जाहिरातीची वाट होती. त्यानंतर ११४ जागांसाठी जाहिरात आल्याने अनेकांना यासाठी अर्ज करता येणार आहे.