लोकसत्ता टीम
चंद्रपूर: जनता कनिष्ठ महाविद्यालयातील नुकताच बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी मुस्तफा लक्कडशा जूनियर याने जेईई मेन पेपर २ ए (बी.आर्क) २०२३ या परीक्षेत अखिल भारतीय रँक ४२ वी रँक (AIR) मिळवली आहे. त्याने ९९.९४ टक्के गुण घेत विदर्भात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मुस्तफाने हे यश केवळ त्याच्या समर्पण, कठोर परिश्रम, चिकाटीच्या जोरावर आणि वेळोवेळी मिळालेल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाने तथा आई वडिलांकडून मिळालेल्या प्रेरणेने मिळविले आहे. उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मुस्तफाचे संस्थेचे सचिव डॉ. अशोक जिवतोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष, उपप्राचार्य कविता रंगारी यांनी अभिनंदन केले आहे.