नागपूर: सोन्याचे दर विक्रमी उंचीव गेल्यावर सराफा व्यवसायिकांकडून चिंता व्यक्त होत होती. तर सोने- चांदीचे आणखी भाव वढण्याचे संकेत बघत ग्राहकांनाही धडकी भरली होती. परंतु आता हळू- हळू सोने- चांदीचे दर कमी होतांना दिसत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान नागपंचमीच्या दिवशी मंगळवारी (२९ जुलै २०२५) सराफा बाजार उघडल्यावर सोन्याच्या दराने मागील दहा दिवसांतील निच्चांकी दर नोंदवले आहे. परंतु काही तासांतच ग्राहकांमध्ये पुन्हा चिंता वाढली.
नागपुरातील सराफा बाजारात २४ जुलै २०२५ रोजी पावसाळ्याच्या दिवसांत सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९९ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९२ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७७ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार ७०० रुपये होते. हे दर २८ जूलैला २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ९८ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९१ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार रुपये नोंदवले गेले.
तर मंगळवारी नागपंचमीच्या दिवशी २९ जुलैला नागपुरात सराफा बाजार उघडताच सकाळी १० वाजता सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९८ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९१ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६३ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. परंतु दोन तासांनी १२ वाजता हे दर किंचित वाढून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ९८ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९१ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार रुपये नोंदवले गेले. दरम्यान हे दर येत्या काळात आणखी वाढण्याचे संकेत नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडून दिले जात असून ही सोने- चांदीचे दागिने खरेदीसाठी चांगली वेळ असल्याचा त्यांचा दावा आहे.
चांदीच्या दरातही मोठे बदल…
नागपुरातील सराफा बाजारात मेकिंग व जीएसटी शुल्क वगळता चांदीचे दर प्रति किलो २४ जुलैला १ लाख १५ हजार ५०० रुपये होते. हे दर २८ जुलैला प्रति किलो १ लाख १३ हजार ८०० रुपये नोंदवले गेले. तर नागपंचमीच्या दिवशी चांदीचे दर प्रति किलो १लाख १४ हजार १०० रुपये नोंदवले गेले. तर २८ जुलैच्या तुलनेत २९ जुलैला नागपुरात चांदीचे दर प्रति किलो ३०० रुपयांनी वाढलेले दिसत आहे.