दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा नागपूर शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साचले असून ऐन कार्यालयीन वेळेत पाऊस आल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली.

सलग दहा-बारा दिवस नागपुरसह संपूर्ण विदर्भात पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. दोन दिवस पावसाने उघडीप दिली आणि पूर ओसरू लागल्याने सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. मात्र, आज (शनिवार) सकाळपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली.

यवतमाळ : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे जोरदार पुनरागमन ; नागरिकांमध्ये पुराची भीती

हवामान खात्याने तीन ते चार दिवस पावसाचा इशारा दिल्याने सर्वांनाच धडकी भरली आहे. महापालिकेचे व्यवस्थापन नसल्याने शहरातील रस्ते थोड्याशा पावसाने वाहू लागतात. काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने पुन्हा एकदा याचा प्रत्यय दिला आहे.