नागपूर : एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाला भीषण अपघात झाला, आता सर्व प्रमुख विमानतळांना सतर्कता बाळगली जात आहे. काही नव्याने उपाययोजना केल्या जात आहेत. दिल्ली, मुंबई, जयपूर, अहमदाबादसह इतर मोठ्या विमानतळांवर रनवे व्हिज्युअल रेंज (आरव्हीआर) प्रणाली बसवण्यात आली होती.आता ही यंत्रणा नागपूर विमानतळावर लावण्यात आली आहे.

वाईट हवामानामुळे किंवा कमी दृश्यमानतेमुळे विमानांना अनेक वेळा इतरत्र वळवावे लागते. परंतु, आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्याधुनिक रनवे व्हिज्युअल रेंज (आरव्हीआर) प्रणाली लावण्यात आली आहे. ही प्रणाली दृश्यमानतेची अचूक गणना आपोआप करते आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्षासह वैमानिकाला ही माहिती पाठवते. त्यामुळे धुके, मुसळधार पाऊस आणि खराब हवामानात सुरक्षित लैंडिंग आणि टेकऑफ शक्य होणार आहे.

नागपूर विमानतळ ५५० मीटरच्या दृश्यमानतेवर काम करू शकते. यासाठी धावपट्टीवरील ऍप्रोच लायटिंग सिस्टम ही एक महत्त्वाची प्रकाश व्यवस्था आहे. ती विमानतळाच्या धावपट्टीच्या अप्रोच एंडवर स्थापित केलेली आहे. ६०-६० मीटरवर हे दिवे बसवले आहे. येथील अप्रोच लायटिंग सिस्टम ५५० मीटरच्या दृश्यमानतेसाठी योग्य आहे. दिल्लीसह इतर मोठ्या विमानतळांवरदररोज हजारो प्रवासी विमानतळ दररोज सुमारे आठ हजार प्रवाशांसह ६० देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे हाताळते. रडारसह आरव्हीआरसारख्या उपकरणांसह अपग्रेड केल्याने हवाई वाहतूक व्यवस्थापन मजबूत होऊन नागपूर प्रमुख विमान वाहतूक केंद्र होईल, अशी अपेक्षा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापेक्षा चांगली प्रकाश व्यवस्था आहे. खराब हवामानात जेव्हा दृश्यमानता १५०० मीटरपेक्षा कमी होते तेव्हा आरव्हीआरची मदत घेतली जाते. विशेषतः खराब हवामानात सुरक्षेसाठी हे उपकरण महत्त्वाचे मानले जाते. विमानतळावर महिनाभरापूर्वीच रनवे व्हिज्युअल रेंज प्रणाली बसविण्यात आली आहे. आरव्हीआर बसवण्यापूर्वी दृश्यतामान मोजण्यासाठी एका कर्मचाऱ्याला धावपट्टीवर पाठवून दृश्यमानतेचा अंदाज घेतला जात होता. या प्रक्रियेनंतरच विमान उतरवण्यास परवानगी दिली जात होती. यात बराच वेळ वाया जात होता.