नागपूर : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील कायमच चर्चेत असतात. अनेक कार्यक्रमांमध्ये त्या उपस्थित असतात. देवेंद्र आणि अमृता यांचे लग्न २००५ मध्ये झाले. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची लव्हस्टोरी अत्यंत खास आहे. पहिल्याच भेटीमध्ये दोघे एकमेकांना बोलण्यात इतके जास्त मग्न झाले की, त्यांना वेळेचे भानच राहिले नाही. हल्ली अमृता फडणवीसही त्यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे चर्चेत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात येण्यापूर्वी मॉडलींगही केली आहे हे विशेष. त्यांच्या देखणेपणाची अनेकदा चर्चा असता. यावर्षीच्या दिवाळीला फडणवीसांनी त्यांच्या कपड्यांमध्ये बदल केला. यावरून त्यांना विचारणा करण्यात आली असून फडणवीसंचे उत्तर ऐकण्याजोगे होते.
नागपूरमध्ये झालेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात फडणवीस यांनी विविध विषयांवर मनमोकळी चर्चा केली. यावेळी त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांवर चर्चांना वाचा फोडली. फडणवीस हे कायम पांढरा सदरा, गर्द निळ्या रंगाची पॅन्ट आणि त्यावर मोदी जॅकेट घालतात. याशिवाय त्यांना वेगळ्या पोशाखात पाहिल्याचे आठवत नाही. मात्र, यावर्षीच्या दिवाळीला फडणवीसांनी त्यांच्या कपड्यांमध्ये अनोखा बदल केला आहे. यंदाच्या दिवाळीत त्यांनी निळ्या रंगाचा कुर्ता, पायजामा आणि गुलाबी रंगाचा मोदी जॅकेट घातला आहे. यावर ते अधिकच देखणे दिसत आहेत. तर अमृता फडणवीस आणि त्यांच्या मुलीने सारखा पोशाख घातला आहे. हा फोटो सोशल मिडीयावर झळकताच त्यांची सर्वत्र चर्चा झाली.
या नवीन पोशाखासाठी फडणवीसांचे कौतूक करत घरातून म्हणजे अमृती वहिणींनी तुम्हाला कॉम्पीमेंट दिली की नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर घरातून कौतूक झाले, मात्र, त्यापेक्षा अधिक कौतूक बाहेरच्या लोकांनी केले असे फडणवीस म्हणाले. हा नवीन पोशाख म्हणजे दिल्लीला जाण्याचे संकेत आहेत का?, असा प्रश्नही फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मी २०२९ पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार हे निश्चित असल्याचे स्पष्ट केले. तसेच हा नवीन बदल स्वीकारला हे मात्र, त्यांनी मान्य केले.
हातात असलेल्या धाग्यांवर काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घड्याळ का घालत नाहीत. यावर फडणवीस म्हणाले, मी घड्याळी घालत नाही, मी अंगठीही घालत नाही. एक मात्र खरे मी धागा घालतो आणि तो कायमच माझ्या हातात असतो. मात्र, मी घड्याळ घालत नसलो तरीही वेळेच्या बाबतीत मी अगदी वक्तशीर आहे. त्यात मात्र माझ्या घड्याळाचा काटा कुठेही इकडेतिकडे होत नाही. त्यामुळे घड्यात हातात असले काय, किंवा नसले काय, मला काहीही फरक पडत नाही. माझी सर्व कामे वेळच्या वेळेतच होतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
