नागपूर : ईव्हीएम एक यंत्र असल्याने त्याला माहिती तंत्रज्ञान कायदा लागू होतो. मात्र या कायद्याची पायमल्ली करून ईव्हीएम उपयोगात आणली जाणार आहे. त्यामुळे निवडणूक पारदर्शीपणे होणे अशक्य आहे. म्हणून निवडणूक बॅलेट पेपरने घेण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग यांना येत्या १ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्या खंडपीठ समक्ष या प्रकरणी सुनावणी झाली. आंबेडकराइट पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय मानकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. ते नागपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढत आहेत.

हेही वाचा : राज्यात उकाडा वाढला; उष्माघाताचे ८२ रुग्ण

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur court petition demand of voting on ballot paper as evm machine violate information technology act tpd 96 css
First published on: 16-04-2024 at 10:59 IST