नागपूर : महालमधील झेंडा चौकात एका दाम्पत्यासह चौघांना कारने चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या गांजाच्या नशेतील तीनही आरोपींचे गुन्हेगारी ‘कनेक्शन’ समोर आले आहे.

तीनपैकी दोन आरोपींवर शहरातील विविध ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर एक आरोपी महापालिकेचा कर्मचारी आहे. तीनही आरोपींना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अपघातातील चारपैकी मायलेक गंभीर जखमी आहेत तर दोघांना किरकोळ मार लागला आहे. या प्रकरणी अपघातासह कारमध्ये गांजा सापडल्यामुळे पोलिसांनी एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. सनी सुरेंद्र चव्हाण (३७, कापलावस्ती, इमामवाडा), अंशूल विजय ढाले (२४, जाततरोडी) आणि आकाश नरेंद्र महेरुलिया (गवळीपुरा, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Tiger, gypsy, Tadoba, gypsy drivers,
ताडोबात जिप्सी चालकांनी घेरले वाघाला! व्यवस्थापन हादरले, पर्यटक…
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Hamas men confess
“माझ्या वडिलांनी आधी बलात्कार केला, मग मी आणि…”, हमासच्या बाप-लेकाचे इस्रायली महिलेशी राक्षसी कृत्य
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
RTE, parent, Rukhsar,
आरटीई घोटाळा : रुखसार उर्फ रुपाली शेखसह फरार पालकाला अटक, मोठे गबाड लागणार हाती
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
Ajit-pawar-lok-sabha-Election-result_4a656f
बारामतीचा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी? ११ मिनिटांच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांचं सहावेळा ‘हे’ वक्तव्य

हेही वाचा – आरटीई घोटाळा : रुखसार उर्फ रुपाली शेखसह फरार पालकाला अटक, मोठे गबाड लागणार हाती

वसीम शेख (३०) हे पत्नी नाझमीन (२४) आणि मुलगा जोहान (दीड महिना) यांच्यासह शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता दुचाकीने डॉक्टरांकडे मुलाच्या लसीकरणासाठी जात होते. महालमधील झेंडा चौकातून जात असताना त्याच दरम्यान आरोपी सनी चव्हाण, अंशूल ढाले आणि आकाश मेहरुलिया हे तिघेही दारु आणि गांजाच्या नशेत भरधाव कारने येत होते.

भरधाव कारने वसीमच्या दुचाकीला आणि रस्त्यावरून पायी चालणारे सचिन सूर्यभान सरदार (३०, शिवाजीनगर, महाल) या चौघांना धडक दिली. या अपघातात चौघेही गंभीर जखमी झाले. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आई नाझमीन आणि तिचे बाळ जोहान यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. कारमधील सन्नी चव्हाणला जमावाने बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले. तर कारमधील अन्य दोघे आकाश महेरुलिया आणि अंशूल ढाले हे पळून गेले होते. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. कारमधील तिनही तरुण दारु आणि गांजाच्या नशेत होते. त्यांची वैद्यकीय चाचणी केली असता ही माहिती समोर आली.

आरोपीच्या कारमधून दारूच्या बाटल्या आणि ३२ ग्रॅम गांजा, चिलम पोलिसांनी जप्त केली. पोलिसांनी एनडीपीएस अॅक्टनुसारही गुन्हा दाखल केला. सनी चव्हाण आणि अंशूल ढाले हे दोघेही कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा – ताडोबात जिप्सी चालकांनी घेरले वाघाला! व्यवस्थापन हादरले, पर्यटक…

एका भरधाव कारने कोतवाली पोलीस स्टेशनच्या झेंडा चौक परिसरात कारने चौघांना धडक दिली. लोकांनी एका आरोपीला पकडले. याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कारमधून दारूच्या बाटल्या आणि गांजा जप्त करण्यात आला. त्यामुळे एनडीपीएस अॅक्टनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला. – गोरख भामरे (पोलीस उपायुक्त)

पुण्यातील अपघातामुळे वातावरण ढवळले

नुकताच पुण्यातील कल्याणीनगरमधील अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवून दोघांना चिरडल्याचे प्रकरण ताजे आहे. या अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्यानंतरही अल्पवयीन मुलाला लवकर जामीन मिळाला. तसेच त्याला विशेष वागणूक मिळाल्याची चर्चा असल्याने जनतेत संतापाची लाट उसळली. या अपघातानंतर दारू पिऊन वाहने चालविणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राज्यभरातून करण्यात येत आहे. ही घटना घडल्याच्या काही दिवसांत नागपुरातही भरधाव कारने तिघांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातातही कोतवाली पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.