गोंदिया : विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या ताफ्यातील पोलीस वाहन आणि विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात गोरेगाव येथील एका तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज शनिवार १९ जुलै रोजी गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली येथे दुपारी १२ घडली.अरविंद चव्हाण वय (३६) रा. महाजनटोली, गोरेगाव असे या अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे. हा तरुण गोंदियाकडून गोरेगावकडे येत असताना आमदार परिणय फुके यांचा ताफा गोंदियाकडे जात होता.

ताफ्यातील पायलट पोलीस वाहन व तरुणाची दुचाकीत जोरदार धडक झाली. यातच तरुण गंभीर जखमी झाला. आमदार परिणय फुके यांनी जखमीला गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविले. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.प्रकरण गोरेगाव पोलिसांनी दाखल केले आहे.पुढील तपास गोरेगाव पोलिस करत आहे.

परिणय फुके जिल्हा बँकेच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष निवडणुक करिता गोंदियात…..

शनिवार १९ जुलै रोजी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवाची निवड करण्यात येणार होती. गोंदिया जिल्हा बँकेची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार ) आणि भारतीय जनता पक्ष यांनी युती करून लढविली होती. त्याकरिता आज शनिवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव निवड करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि भाजपच्या गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आमदार परिणय फुके नागपूर वरून गोंदियाला जात असताना त्यांच्या ताफ्यातील पायलट वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शतपावली करीत असताना अपघाती मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा – खैरलांजी मार्गावर भरधाव दुचाकीने धडक दिल्याने रात्रीच्या जेवणा नंतर शतपावली करित असलेल्या संतोष अलमचंदानी यांचा मृत्यू झाला. दुचाकीवरील तीन जण जखमी झाले असून यातील एक गंभीर जखमी असल्याची घटना काल गुरुवारी रात्री १०:२०वाजताच्या सुमारास घडली. तिरोडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संत कंवररामवार्ड, सिंधी कॉलनी तिरोडा येथील रहिवासी संतोष द्वारकादास आलमचंदानी (५१ वर्ष) हे आपले पत्नीसह जेवण झाल्यानंतर रस्त्याचे कडेने शतपावली करित असता भरधाव दुचाकी क्रमांक एम. एच. ३१ / इडी ५६८७ ने आलमचंदानी यांना जबर धडक दिली. आलमचंदानी हे यांना त्वरित उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे नेण्यात आले. मात्र प्राथमिक उपचारा नंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.