नागपूर : इंधन दरवाढ झाल्याने नागपूर शहर बसच्या (आपली बस) प्रवास भाड्यात १६ जूनपासून १७ टक्क्यांची वाढ करण्यात आली. किमान भाडे १२ रुपये करण्यात आले. त्याचबरोबर ऑटोरिक्षा चालकांनीही एक किलोमीटरसाठी १८ रुपये दर निश्चत केले आहे. या तुलनेत नागपूर मेट्रोचे दर सर्वात कमी म्हणजे एका टप्प्यासाठी फक्त पाच रुपये आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंधन दरवाढीची झळ सर्वांनाच बसली असून जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. पेट्रोलच्या किंमती वाढल्याने दुचाकी वापरणाऱ्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले असून पेट्रोलच्या खर्चात दुप्पटीने वाढ झाली. एका घरात किमान दोन दुचाकी आहेत. त्यांचा महिन्याचा पेट्रोलचा खर्च अडीच ते तीन हजारावर गेला. त्यामुळे अनेक जण सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करू लागले. परंतु आता शहर बस आणि ऑटोचालकांनीही प्रवासी भाड्याच्या दरात घसघशीत वाढ केली.

या पार्श्वभूमीवर मट्रोची सेवा सध्या सर्वात स्वस्त आणि सुरक्षित आहे. सध्या मेट्रो वर्धा आणि हिंगणा मार्गावर धावत असून त्याचे तिकीट दर पाच रुपये ते १० रुपये आहेत. शिवाय ही वातानुकूलित सेवा असून विद्यार्थी आणि चाकरमान्यांसाठी सोयीची आहे.

हेही वाचा : पुण्यासाठी १४० किमी प्रतितास धावणारी बिनपैशांची मेट्रो? नितीन गडकरींनी सांगितलं गणित!

शिवाय मेट्रोने सायकलसह प्रवास करण्याची मुभा दिली असून प्रत्येक स्थानकावर ‘ई-बाईक’ आणि सायकल सेवाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रवासी मेट्रोकडे वळू लागले आहेत. गर्दी वाढल्याने मेट्रोने फेऱ्यांची संख्या वाढवली असून रात्री १० पर्यंत आता मेट्रो धावते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur metro travel become cheap compare to city bus and rikshaw pbs
First published on: 18-06-2022 at 09:16 IST