मुस्लिमबहुल भागातून कमळ गायब

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य नागपूर मतदारसंघ

मध्य नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव असलेल्या प्रभाग क्रमांक १८ मधून महापौर प्रवीण दटके यांच्यासह भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले असले तरी एका जागेवरून काँग्रेसचा नवखा उमेदवार बंटी शेळके  यांनी स्थायी समितीच्या अध्यक्ष सुधीर (बंडू) राऊत यांचा धक्कादायक पराभव केला. काँग्रेसच्या प्रथम निवडणूक लढलेल्या उमेदवाराने येथून भाजपचा पराभव केल्याने बंटी शेळके ‘जॉईंट किलर’ ठरले आहे. प्रभाग ८ या मुस्लिम बहुल भागातूनही जैतुनबी अशफाक यांच्या पराभव झाल्याने येथून भाजपचे कमळ गायब झाले आहे.

भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींचे निवासस्थान, सलग दोन वेळा आमदार असलेल्या विकास कुंभारेसह विद्यमान महापौर असलेल्या प्रवीण दटके यांचा भाग असल्याने मध्य नागपूरच्या सहा प्रभागातील एकूण २४ जागांवर सगळ्या नागपुरकरांचे लक्ष लागले होते. या मतदार संघातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याकरिता गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विकास कुंभारे यांनी अनेक सभा घेऊन रॅलीही काढल्या. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान गडकरींना हलबा समाजाच्या रोषालाही दोनदा समोर जावे लागले होते. निवडणुकीनंतरच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

विद्यमान निकाल बघता भाजपच्या दिग्गजांनी केलेल्या प्रयत्नाला काही अंशी चांगले यशही मिळाल्याचे दिसते. मध्य नागपूरच्या मुस्लिम बहुल मोमीनपुरा भागात भाजपच्या अहमद जैतुनबी अशफाक यांचा पराभव झाला. गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला प्रथमच मुस्लिमबहुल भागात जैतुनबीच्या माध्यमातून कमळ फुलवता आले होते. परंतु या पराभवाने पुन्हा या भागातून भाजपचे कमळ गायब झाले. भाजपने तिकीट नाकारल्याने अनिल धावडे यांनी शिवसेनेचे धनुष्य पकडून निवडणूक लढवली. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. येथून भाजपचे चाफले विजयी झाले. काँग्रेसच्या माजी नगरसेविका कांता पराते यांनाही प्रभाग क्रमांक प्रभाग २२ मधून पराभव पत्करावा लागला. येथून भाजपचे चारही ऊमेदवार विजयी झाले.

 

विजयी उमेदवार

प्रभाग क्रमांक ८

अ) विजयी  आशा नेहरू उईके (आयेशा) (काँग्रेस)

ब) अंसारी सय्यदा बेगम मो. निजामुद्दीन (काँग्रेस)

क) अंसारी झीशान मुमताज मो. इरफान (काँग्रेस)

ड) भुट्टो जुलफेकार अहमद (काँग्रेस)

प्रभाग क्र. १८

अ) प्रवीण प्रभाकर दटके (भाजप)

ब) सुमेधा श्रीकांत देशपांडे (भाजप)

क) नेहा नरेंद्र वाघमारे (भाजप)

ड) बंटी शेळके (काँग्रेस)

प्रभाग क्र. १९

अ) अ‍ॅड. संजयकुमार कृष्णराव बालपांडे (भाजप)

ब) विद्या राजेश कन्हेरे (भाजप)

क) सरला कमलेश नायक (भाजप)

ड) दयाशंकर चंद्रशेखर तिवारी (भाजप)

प्रभाग क्रमाक २०

अ) शकुंतला वामण पारवे (भाजप)

ब) यशश्री नंदनवार (हेडाऊ) (भाजप)

क) रमेश पुणेकर (काँग्रेस)

ड) दीपराज भैय्याजी पार्डीकर (भाजप)

प्रभाग क्र. २२

अ)  राजेश घोडपागे (भाजप)

ब) वंदना यंगटवार (भाजप)

क) श्रद्धा पाठक (भाजप)

ड) मनोज चाफले (भाजप)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur municipal corporation elections 2017 results nagpur municipal election results 2017 bunty shelke
First published on: 24-02-2017 at 04:25 IST