Marbat Festival Focus Issues Terrorism Inflation Corruption : नागपूर : पोळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी २३ ऑगस्टला जागनाथ बुधवारी येथून भोसले कालीन इतिहासिक परंपरा लाभलेली काळी-पिवळी मारबत मिरवणूक निघणार आहे. १३५ वर्षांहून अधिक काळाची परंपरा असलेली ही मिरवणूक शहराचे सांस्कृतिक वैभव म्हणूनही परिचित आहे. त्यामुळे या मिरवणूकीला कसलेही गालबोट लागू नये, यासाठी पोलीस प्रशासन कंबर कसून सज्ज झाले आहे. जुन्या नागपूर शहरात अलिकडेच घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर या मिरवणूकीत पडसाद उमटू नयेत, यासाठी पोलीस यंत्रणा करडी नजर ठेवून आहे. यंदाच्या मारबत मिरवणूकीदरम्यान पोलीस ड्रोन कॅमेरांच्या माध्यमातून भवतातलच्या अस्वस्थ प्रत्येक हालचालींवर निगराणी ठेवणार आहे.

मस्कासाथ आणि जागनाथ बुधवारी येथून मार्गस्थ झाल्यानंतर काळ्या आणि पिवळी मारबतीची शहीद चौकात (नेहरू पुतळा) गळाभेट होते. ही गळाभेट पाहण्यासाठी सर्वाधिक गर्दी उसळते. त्यामुळे यंदाही होणारी गर्दी लक्षात घेता पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी गुरुवारी स्वतः मिरवणूक मार्गाची पाहणी करीत ग्राऊंड झिरोवरून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

तपासणीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देखील दिल्या. यंदाची मिरवणूक शांतता कायदा व सुव्यवस्थेत पार पडावी यासाठी संपूर्ण मिरवणूक मार्गात ३ हजार पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ.सिंगल यांनी स्पष्ट केले. यासोबतच संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जाईल. कोणत्याही संशयास्पद हालचालीवर त्वरित कारवाई करता, यावी यासाठी साध्या वेशातील पोलिसही गर्दीत उपस्थित राहतील, असे संकेतही त्यांनी दिले.

मिरवणूक मार्गाचा नकाशा

जागनाथ बुधवारी येथून निघणारी काळी-पिवळी मस्कासाथ, मारबत मिरवणूक ही नागपूरच्या प्राचीन सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक आहे. ही मिरवणूक केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाची नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतिक देखील मानली जाते. मिरवणूकीदरम्यान सुरक्षेसोबतच गर्दी व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्थेकडेही पोलिसांचे विशेष लक्ष आहे. वाहतूक पोलिसांनी मूरवणूक मार्गांचा नकाशा तयार केला आहे. मिरवणूकी दरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांचाही निर्णय घेण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी शिघ्र कृती दल (QRT), अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका सेवा देखील सज्ज ठेवण्यात येणार आहे.

प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आणि नागरिकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. ही पारंपारिक आणि सांस्कृतिक मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नका. डॉ. रविंद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नागपूर</strong>