बुलढाणा: अनेक दिवसांपासून सनदशीर मार्गाने करण्यात येणाऱ्या मागण्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे संतप्त टाकरखेड भागीले येथील ग्रामस्थ आज आक्रमक झाले. त्यांनी आज मंगळवारी दुपारी नागपूर पुणे महामार्ग वर ठिय्या मांडला. यामुळे मागील एका तासापासून वाहतूक ठप्प झाली असून दुतर्फा वाहनांच्या दीर्घ रांगा लागल्या आहे.
या महामार्गाच्या दुतर्फा नाल्यांचे बांधकाम करावे. नजीकच्या शेतात पाणी जाऊन होणारे नुकसान रोखावे, मार्गावर सिग्नल व गतिरोधक बसवावे, गावात सुविधा आदी मुख्य मागण्यासाठी टाकरखेड भागीले (ता. देऊळगाव राजा) येथील ग्रामस्थांनी हे उस्फुर्त आंदोलन केले. आंदोलन कर्त्यांनी महामार्ग रोखल्याने वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूला कमीअधिक ५ किलोमीटर अंतर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे वृत्त आहे. परिणामी शेकडो प्रवाशी, वाहनधारकांचे हाल झाले.