नागपूर : कोराडी मार्गावरील मानकापूर उड्डाणपुलावर शुक्रवारी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात गाडीचा चालक आणि एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. त्यामुळे भानावर आलेल्या यंत्रणेने अखेर अक्षम्य निष्काळजीपणा दाखल्या प्रकरणात प्राणांतिक अपघाताला जबाबदार ठरल्यावरून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणारा बसचालक, विजय मोरे, टाटा मॅजिक वाहनाचा चालक राजेश यादव, भवन्स शाळेच्या वाहतूकीचे कामकाज पाहणारे प्रभारी, ऑरिएंटल नागपूर बैतूल महामार्ग लिमी.
कंपनी खंभाराचे चे कंत्राटदार राजनेशकुमार सिंग, स्थानिक साईट प्रभारी श्रीराव, वं पननीचे इतर संबंधित अशा सहा जणांवर सुरक्षेशी निगडीत दिशा दर्शक फलकांच्या सुरक्षा मानकांचे उल्लिंघन केल्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले.
मानकापूर उड्डाणपुलावर टाटा मॅजिक स्कूल व्हॅन आणि आणि आणखी एक शाळेतल्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या गाड्यांत भिषण अपघात झाला. यात शाळेच्या वाहनातील विद्यार्थी सान्वी देवेंद्र खोब्रागडे, श्रीजा कुणाल सुर्यवंशी, हृदया कुणाल सुर्यवंशी, स्वयं दिपक ठाकरे, यश विनोद मेश्राम, काव्या संजय केदार, प्रियांशिका राकेश शेंडे, आदिराज देवंद्र खोब्रागडे, जी. पूर्वी या विद्यार्थ्यांसह स्कूल व्हॅन चालक रितीक घनश्याम कनोजिया हे जखमी झाले. त्यापैकी विद्यार्थीनी सान्वी खोब्रागडे आणि चालक रितीक कनोजिया या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघातग्रस्त स्कूलबसची नोंदणी रद्द होणार…
मानकापूर उड्डाणपुलावर शुक्रवारी स्कूलबस व स्कूलव्हॅन समोरासमोर धडकल्याने दोघांचा मृत्यू झाला. यातील स्कूलव्हॅनचा परवाना व योग्यता तपासणी झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनात आला आहे. त्यामुळे भविष्यात या स्कूलव्हॅनची नोंदणी रद्द होण्याचे संकेत आहेत. आरटीओच्या पथकाने अपघातग्रस्त जागेची पाहणी केली. पथकाला उड्डाणपुलावरील एकाच बाजूची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनात आले.
स्कूलव्हॅन चालकाने वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुसऱ्या स्कूलबसला धडक दिल्याचे प्राथमिक तपासणीत दिसत आहे. या स्कूलबसमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक होत असतांनाही परवाना व योग्यता तपासणीची मुदत संपली असल्याचे पुढे आले. त्यामुळे आरटीओकडून या स्कूलव्हॅनला नोटीसही बजावली गेली होती. या स्कूलव्हॅनचा विमा व कर मात्र भरला होता. सर्व कागदपत्र प्राथमिक चौकशीत योग्य असल्याचेही आरटीओच्या चमूच्या निदर्शनात आले. त्याचा अहवाल आरटीओकडून संबंधित यंत्रणेला पाठवला जाणार आहे. स्कूलव्हॅन मालकाची अक्षम्य चूक बघता तातडीने त्याला परवाना नोंदणी रद्द करण्याबाबतची नोटीस बजावून कायमची नोंदणी रद्द करण्याचेही संकेत मिळत आहेत.