पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलावर दुसऱ्याच दिवशी एसटी महामंडळाने या महामार्गावरून नागपूर- शिर्डी विना वातानुकुलीत बस सेवा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा- समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होताच गेला पहिला बळी, महामार्गावर वाहनाच्या धडकेत…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही बस बिना थांबा जलद बस असेल. विना वातानुकूलीत आसनी शयनयान प्रकारातील ही बस १५ डिसेंबरपासून धावणार आहे. नागपूरच्या गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावरुन ही बस रात्री ९ वाजता शिर्डीसाठी निघेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता शिर्डीला पोहचेल. तर शिर्डी येथून रात्री ९ वाजता ही बस सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता नागपूरला पोहचेल. बसचे भाडे १ हजार ३०० रुपये राहिल. बसमध्ये महामंडळाच्या योजनेनुसार ७५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत दिली जाईल. सदर बससेवेचा लाभ सर्व नागरीकानी घ्यावा असे आवाहन नागपूरचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभने यांनी केले.