नागपूर: पंधरा दिवसांपूर्वी भूस्खलनाने उत्तराखंडातील बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना वाचवण्यासाठी नागपुरातील वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि)ची चमूसुद्धा धडपड करत आहे. ही चार सदस्यीय चमू बचाव पथकाला तांत्रिक बचावाचे सल्ले देत असून मजुरांना बाहेर काढण्यासाठी ‘कॅप्सूल’चेही काम करणार आहे.

नागपुरातील वेकोलितून गेलेल्या पथकाचे नेतृत्व दिनेश बिसेन, महाव्यवस्थापक, (मायनिंग, बचाव कार्य), वेकोलि करत आहेत. पथकात वेकोलितील बचाव कार्य विभागातील आणखी एका अधिकाऱ्यासोबतच दुसऱ्या विभागातील दोन तांत्रिक अधिकारी अशा चौघांचा समावेश आहे. ही चमू सिलक्यारा येथून बचावकार्यात सामील झाली असून मजुरांना वाचवण्यासाठी धडपड करत आहे.

हेही वाचा… गावे महाराष्ट्रात, मतदान तेलंगणमध्ये! चंद्रपुरातील १४ गावांत प्रचारधडाका, ३ हजार ६०२ मतदार

‘व्हर्टिकल ड्रिलिंग’नंतर मजुरांना वरून बाहेर काढण्याच्या ‘कॅप्सूल’चेही काम नागपूरवरून आलेली वेकोलिची चमू करू शकते. उत्तरकाशीमध्ये सुरू असलेल्या विविध विभागातील बचाव चमूंना मजुरांच्या सुरक्षिततेसाठी थांबून अंदाज घेत काम करावे लागत आहे. देशातील अन्य भागातून पाठवलेली यंत्रसामग्री रस्ते मार्गाने सिलक्यारा येथे पोहचण्यास पावसामुळे विलंब होत आहे. त्यामुळे बचाव कामात अडथळे येत आहे. त्यामुळे मजूर अडकलेल्या डोंगरातील वेगवेगळ्या भागासह उभ्या मार्गाने ‘व्हर्टिकल ड्रिलिंग’ही सुरू करण्यात आले आहे. त्यापैकी एक खोदकाम यशस्वी झाल्यास मजुरांना बाहेर काढले जाईल. या वृत्ताला वेकोलितील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटना काय?

उत्तराखंडमध्ये चारधाम प्रकल्पाचा भाग असलेल्या सिलक्यारा ते बारकोट या पाच किलोमीटरच्या बांधकामाधीन बोगद्याचा काही भाग १२ नोव्हेंबरला कोसळला. बोगद्याच्या सिलक्यारा दिशेकडील सुमारे ६० मीटरचा भाग खचल्याने ४१ कामगार अडकले. बोगद्याच्या बांधून तयार असलेल्या दोन किलोमीटर भागात हे कामगार अडकले होते.