वर्धा : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात वर्धा येथील चौदा प्रवासी सापडले. त्या सर्वांची नावे पुढे आली आहेत. यात हिमाचल प्रदेश इथला म्हटला जाणारा पंकज रमेशचंद्र हा उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले.

उर्वरित तेरा प्रवाशांमध्ये संजीवनी गोटे, प्रथमेश खोडे, करण बुधबवरे, तेजस पोकळे, वृषाली वणकर, शोभा वणकर, एक दोन वर्षीय मुलगा, तनिशा तायडे, राधिका खडसे, श्रेया वंजारी, सुशील खेलकर, अवंतिका पौनिकर, राजश्री गांडोले आणि तेजू राऊत यांचा समावेश आहे.

हेही वाचा – Buldhana Accident : अकरा मृतांची ओळख पटली; नागपुरातील चौघांचा समावेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आज आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या पाठोपाठ खासदार रामदास तडस यांनी सहभागी होत काही सूचना केल्या. प्रशासनाने प्रवाशांच्या आप्तांची भेट घेवून शक्य ती मदत करावी, माझ्याकडून काही मदत हवी असल्यास त्वरित सांगावे, असे त्यांनी सूचविले.