नागपूर : हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर मोठा आरोप केला. रवींद्र चव्हाण यांनी एका तरुणाचे अपहरण करून त्याला त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवले असल्याचे ते म्हणाले. चव्हाण यांच्या घरात त्या तरुणाला बेदम मारहाण देखील झाल्याचे त्यांनी सांगितले.

नाना पटोले यांनी केलेल्या आरोपानुसार, तरुणाने ९ कोटींची रक्कम गहाळ केली होती. त्याच्याकडून साडेचार कोटी रक्कम जप्त करण्यात आली, मात्र उर्वरित रक्कम न मिळाल्याने तरुणाला चव्हाण यांच्या बंगल्यात डांबून ठेवण्यात आले आहे. नाना पटोले यांना याबाबत अधिक माहिती विचारल्यावर त्यांनी माध्यमांना स्वतः चौकशी करण्याचे सांगितले.

हेही वाचा – फडणवीसांचाच प्रस्ताव स्वीकारायला हवा होता… शपथविधीनंतर शिंदेंच्या आमदाराकडून उघड…

हेही वाचा – मंत्रिपद नाकारले; भुजबळ समर्थक रस्त्यावर, कुटे समर्थकांचा समाजमाध्यमावर निषेध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जनतेच्या मताचे सरकार नाही

सध्याचे सरकार हे जनतेचा मताचे नाही. जर हे सरकार जनतेच्या मताचे असते तर त्यांच्यामध्ये जनतेचा धाक असता. हा धाक नसल्याने परभणी हिंसासारखे प्रकार समोर येत आहेत. परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. पोलिसांनी स्वतः तोडफोड केली आणि आंदोलकांवर आरोप केला. सामान्य माणसांवर कायदेशीर कारवाई लगेच होते, मात्र दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही, असा सवाल नाना पटोले यांनी विचारला. विधानसभेत याबाबत स्थगन प्रस्ताव दिल्यावर तो अध्यक्षांनी स्वीकारला नाही, अशी माहिती पटोले यांनी दिली.