नाना पटोले यांना भाजप समजली नाही त्यामुळे भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये गेले. भाजप हा व्यक्तीसाठी आणि परिवारासाठी काम करत नाही त्यामुळे कधीच पक्षात स्फोट होऊ शकत नाही. उलट काँग्रेसमध्ये एकमेकाचे पाय ओढण्याचे काम सुरू असल्यामुळे त्यांच्या पक्षात स्फोट होण्याची जास्त शक्यता अधिक आहे,अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशएखर बावनकुळे यांनी केली. ते नागपुरात बोलत होते.  

हेही वाचा >>> पत्रकारांचे भाजप कार्यकर्त्यांना ढाब्यावर जेवणाचं आवतण; बुलढाण्यातील पत्रकारांची ‘आधुनिक गांधीगिरी’

नाना पटोले यांनी भाजपमध्ये लवकरच स्फोट होतील असे वक्तव्य केले होते त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, भाजपपेक्षा काँग्रेसमध्ये येणाऱ्या काळात मोठे स्फोट होण्याचे जास्त शक्यता आहे. काँग्रेसच्या काळात आतंकवादी भारतात घुसत होते, कसाबकडून दहशतवादाची पेरणी कॉंग्रेच्या काळात झाली होती. भाजपने  पाकिस्तानच्या घरात घुसून मारण्याची ताकद दाखवली.  या विषयावर नाना पटोले यांच्यासोबत चर्चा करायला कुठल्या चौकात तयार आहे. . ६५ वर्षात काँग्रेसने कसा आतंकवाद पसरवला हे सांगतो असेही बावनकुळे म्हणाले. प्रत्येक समाजाला आरक्षण पाहिजे आणि त्यांसाठी उपोषण करण्याचा अधिकार  आहे. त्यांनी केलेल्या मागण्या समाजाचा अधिकार आहे.  कुणावरही सरकार अन्याय करणार नाही. भाजपचे शासन असल्यामुळे आतापर्यंत सर्व समाजाला न्याय मिळाला आहे पुढे मिळणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.