भंडारा : नाना पटोले यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या संवाद यात्रेचे गोंदियाहून रात्री उशिरा भंडारा शहरात आगमन झाले. शहरातील गांधी चौकात पोहोचताच नाना पटोले यांनी जाहीर सभेत सरकारवर पुन्हा आगडपाखड केली आहे. लोकसभेच्या विशेष अधिवेशनाबाबत नानांनी सरकारला धारेवर धरले.

सरकारच्या ‘एक राष्ट्र एक निवडणूक’च्या निर्णयाबाबत बोलताना नाना म्हणाले की, ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ या संकल्पनेला काँग्रेसचा विरोध नाही. जगाच्या पाठीवर सर्व देशाने बॅलेट आणले आहे. ईव्हीम मशीनवर सगळ्यांचा संशय आहे. तेव्हा, सरकारने ईव्हीमवर निवडणुका न घेता बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजे.

हेही वाचा – चंद्रपूर : भरती रद्द करा! ५३३ अंगणवाडी सेविकांच्या भरतीत अर्थकारणाचा आरोप

पटोले म्हणाले की, मुंबईतील ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’, आणि ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’सुद्धा गुजरातला घेऊन जाण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. मुंबईला तोडण्याचे षडयंत्र मोदी सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

केंद्र सरकारला लोकसभा अधिवेशनाची भीती वाटू लागली आहे. केंद्र सरकारने नवीन लोकसभा भवनात पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. परंतु या विशेष अधिवेशनाचा अजेंडा कोणत्याही खासदाराला कळवला नाही. या अधिवेशनात कदाचित भारताचे तुकडे होऊ शकतात किंवा येणाऱ्या दिवसांत स्वतंत्र विदर्भ राज्य होऊ शकते, पण हे विदर्भाच्या भल्याकरिता नसून मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप नानांनी केला. विदर्भ राज्य वेगळे करून मुंबईमधील अनेक उद्योग गुजरातमध्ये हालवण्याचा भाजपाचा डाव आहे.

हेही वाचा – नागपूर : बलात्काराची तक्रार देण्याची धमकी; फेसबुकवर ‘लाईव्ह’ करून तरुणाची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभेच्या जागाही भविष्यात वाढू शकतात, असे भाकीत नानांनी केले. त्यामुळे पाच दिवसांत विशेष अधिवेशनात काय होते, त्यावर सामान्य जनतेला विश्‍लेषण करावे लागणार असल्याचेही नाना पटोले म्हणाले.