चंद्रपूर : शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष तथा माजी शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल यांची तर चंद्रपूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष पदावर सुधाकर पांडुरंग कातकर यांची नियुक्ती प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते देण्यात आली.

शहर अध्यक्षांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर नव्या नियुक्ती करण्यासंदर्भात प्रांताध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख, चंद्रपूर शहर निरीक्षक शेखर सावरबांधे यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्याशी सविस्तर चर्चा करून वरील नावांची घोषणा केली.

हेही वाचा – अशैक्षणिक कामासाठी समितीचे गठन, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

हेही वाचा – नागपुरात रुग्ण भर पावसात उघड्यावर! मेडिकल रुग्णालय परिसरात चालले काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरात झालेल्या नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमाला चंद्रपूर शहराचे निरीक्षक शेखर सावरबांधे, चंद्रपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महीला अध्यक्षा बेबी उईके, युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी, प्रदेश सरचिटणीस श्री. मुनाज शेख, नागपूर शहर अध्यक्ष दुनेश्र्वर पेठे, नगरसेविका मंगला आखरे, माजी नगरसेवक विनोद लभाने, माजी नगरसेवक राजेंद्र आखरे, राजेंद्र काबरा, बादल उराडे, रवींद्र वाळके, शुभांगी साठे, अनिता मावलिकर, पूजा शेरकी, हरिनाथ यादव, बंडू नगराळे, दशरथ मिट्ठावार, पुष्पा निमगडे, उमा दुर्गे, पुष्पा काटरे, कुरुदुल्ला लिंगय्या, मारोती झाडे उपस्थित होते.