दोन वर्षानंतर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. हे अधिवेशन पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या मुद्द्यांना गाजलं आहे. सीमाप्रश्न, महाराष्ट्रातील प्रकल्प, भूखंड घोटाळ्यावरून विरोधकांनी दोन्ही सभागृहात शिंदे-भाजपा सरकारला धारेवर धरलं आहे. त्यातच आता आमदार निवासातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही व्हिडीओ ट्वीट करत भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

‘आझादी का अमृत महोत्सव’ हा हॅशटॅग वापरून अमोल मिटकरींनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामध्ये आमदार निवासातील कपबशी धुण्यासाठी टॉयलेटमधील पाण्याचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे. “हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था,” असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर

यानंतर टीव्ही ९ मराठीशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “आमदार निवासाचं कोट्यवधी रुपयांचं कंत्राट भाजपाने दिलं आहे. मोजके आमदार त्याठिकाणी राहतात. टॉयलेटमध्ये कपबश्या आणि जेवणाची ताटे धुतले जातात. अजून एक व्हिडीओ आहे, त्यात तिरंगी ध्वजाने इमारती पुसल्या गेल्या आहेत. याबाबत विधानपरिषदेत आवाज उठवणार आहे. १०० कोटी रुपयांचं कंत्राट दिलं असून, ते गेले कुठं,” असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.