नागपूर : नवीन संसद भवनाला घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जावे यासाठी या भवनाला डॉ. आंबेडकर संसद भवन असे नाव द्यावे, अशी मागणी डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण भूमी कमेटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री इंद्रेश गजभिये यांनी रविवारी नागपुरात पत्रपरिषदेत केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. त्यावेळी एससी, एसटीच्या आरक्षित जागाही लोकसभा व विधानसभांच्या जागा सर्वसमावेशक करण्यात आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नागपूर : खाद्य पदार्थांच्या गाड्या पुन्हा रस्त्यांवर, माटेचौक ते आयटी पार्क दरम्यान वाहतूक कोंडी

मात्र, आज ७० वर्षानंतर त्या काही लाभ झालेला नाही. आजही आमची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी आहे, असे गजभिये म्हणाले. महापरिनिर्वाण भूमीबाबत कमेटीने केंद्राकडे पाच मागण्या केल्या आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ६ डिसेंबरला दिल्लीत आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला प्रमोद तभाने, दिपक फुलझेले, सुनंदा खैरकर, माधुरी रंगारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> नागपूर : विद्यापीठ विधिसभा निवडणूक रिंगणात ‘शिक्षक भारती’

‘त्या’ प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासारखे काही नाही

दिल्लीत २२ प्रतिज्ञा म्हटल्यामुळे गदारोळ झाला. त्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आबंडेकर यांनी नागपूरला दीक्षा घेतली, तेव्हापासून आजवर २२ प्रतिज्ञा दीक्षा घेताना म्हटल्या जात आहे. यात गुन्हा दाखल करण्यासारखे काही नव्हते. एवढेच या प्रकरणी सांगू शकतो, असेही गजभिये म्हणाले. मात्र, त्यांनी या घटनेचा निषेध करण्यास नकार दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New parliament house name dr ambedkar sansad bhawan indresh gajbhiye ysh
First published on: 31-10-2022 at 11:30 IST