प्रमोद खडसे

वाशीम : समृध्दी महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावाजवळ चारचाकी गाडीच्या घडकेत एक नीलगाय व चारचाकी गाडीतील तीन जण गंभीर जखमी झाले.

नीलगायच्या दोन पायाला गंभीर दुखापत झाली व एक शिंग तुटले. जखमी रुग्णांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जखमी नीलगाय रात्रीपासून तब्बल आठ तास समृध्दी महामार्गावर जखमी अवस्थेत विव्हळत होती. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी रात्री घटना स्थळी आले परंतु हताश होऊन परत गेले.

हेही वाचा >>>चंद्रपूर: नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करा; सुधीर मुनगंटीवार

स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग ३ अभयारण्यातून जातो. वाशीम जिल्ह्यातील काटेपूर्णा हे अभयारण्य परिसर त्यामध्ये येतो. वन्य प्राण्यांना धोका नको म्हणून ९ ठिकाणी ओव्हारपास व १७ ठिकाणी अंडरपास आहेत. मात्र उर्वरित ठिकाणी रस्त्याच्या कडेला कंपाऊंड केलेले आहे.तरीही वन्य प्राणी रस्त्यावर येत असून अपघात होत आहेत.

हेही वाचा >>>चंद्रपूर: खासदार धानोरकरांच्या मेहुण्याची ‘ईडी’ चौकशी; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची माहिती मागवली

समृध्दी महामार्ग हा शिंदे फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट. मात्र उद्घाटन झाल्यापासून अपघाताच्या घटना वाढतच आहेत. यामधे अनेकांना प्राणास मुकावे लागले. सरकार कडून उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी त्या कुचकामी ठरत आहेत. या महामार्गावर अपघात घडल्यास जखमींना तत्काळ रुग्णवाहिका व इतर सुविधा दिसून येतात. मात्र, मुक्या प्राण्यांचा अपघात झाल्यास त्यांना वन विभाग किंवा रुग्णालयात दाखल करण्याची कोणतीच सुविधा नाही. समृद्धीच्या चेक पोस्ट वरून मदतीसाठी आलेल्या वाहनांना प्रवेश नाकारला जातो. वन्य प्राण्यांचा अपघात घडल्यास वन विभागाकडे बोट दाखवून हात झटकले जातात. यामध्ये निरपराध वन्य प्राण्यांना प्राणास मुकावे लागत असून आवश्यक त्या उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा >>>नागपूर: रेल्वे कंत्राटदाराने खोदलेल्या खड्ड्यात पडून वृद्धाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, समृध्दी महामार्गावर नीलगायचा अपघात झाल्याची माहिती मिळताच वनरक्षक प्रतिभा अहिरे व वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच वन्यप्रेमी आदित्य इंगोले,अनिकेत इंगळे,बुधभूषण सुर्वे,नयन राठोड रात्रीपासून प्रयत्न करीत आहेत. मात्र, नीलगाय उचलणे अवघड असल्याने अथक प्रयत्नांनी तिला कारंजा पर्यटन स्थळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.