नागपूर : नागपूर ते नागभीड रेल्वेमार्गाचे काम करीत असलेल्या कंत्राटदाराने गौण खनिजाचे उत्खनन केल्यामुळे तेथे मोठा खड्डा तयार झाला. या खड्ड्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कामठी तालुक्यातील मौजा आडका येथे गुरुवारी उघडकीस आली.नागपूर-नागभीड रेल्वेमार्गाचे मौजा आडका येथील काम कंत्राटदार पी. व्यंकट रमय्या यांच्या इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मिळाले आहे. या कंपनीने मौजा आडका येथील सुमारे १४ एकर जमीन विकत घेतली. त्या शेतजमिनीतून माती आणि मुरुमाचे उत्खनन केले. तेथे मोठा खड्डा झाला असून पाणी साचले आहे. एवढेच नव्हेतर शेजारी असलेले पुरुषोत्तम खोडके यांच्या शेताला तलावाचे स्वरूप आले आहे.

यात गावातील एका वयोवृद्ध व्यक्तीचा बडून मृत्यू झाला. हे वृत्त कळताच जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे घटनास्थळी पोहोचल्या. या घटनेची जबाबदारी कंत्राटदाराने स्वीकारावी आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी तसेच जलमय झालेले शेत विकत घ्यावे यासाठी आग्रही भूमिका घेतली. लेकुरवाळे यांच्या समर्थनार्थ गावकरी एकत्र आले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, माजी उपसभापती आशीष मल्लेवार, आडक्याचे सरपंच विजय खोडके देखील घटनास्थळी आले. कंत्राटदाराने खोडके यांची तीन एकर शेती घेण्याचे कबूल केले. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये दिले, असे अवंतिका लेकुरवाळे यांनी सांगितले.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Dried pods of opium, Dhule, opium Dhule,
धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित
dombivli ganesh nagar marathi news, dombivli concrete road broken marathi news
डोंबिवली: पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या गणेशनगर मधील काँक्रीट रस्त्याची तोडफोड, नागरिकांमध्ये तीव्र संताप
thieves firing at malkapur railway station
मलकापूर रेल्वेस्थानक परिसरात चोरट्यांचा गोळीबार; पाठलाग करणाऱ्या नागरिकांना…

हेही वाचा >>>पोलीस निरीक्षकाची थेट न्यायाधीशांना धमकी; तडकाफडकी निलंबन, गडचिरोली पोलीस दलात खळबळ

रेल्वेमार्गासाठी कंत्राटदाराने गौण खनिजाचे उत्खनन केल्यानंतर झालेल्या खड्ड्यात पडून मरण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गंत घटना घडली. तसेच उमरेड येथे देखील एकाचा मृत्यू झाला.