लोकसत्ता टीम

नागपूर : रन अँड हिट प्रकरणात तो, कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी त्याला पाठीशी घातले जाणार नाही. सर्वांना कायदा एकच आहे.तो लागू करण्याचे काम या राज्यात करत आहे. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका सरकारची असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

हित अँड रन प्रकरणात आता कोणालाही सोडले जाणार नाही. कायद्यासमोर सर्व समान आहे. सरकार देखील सगळ्या घटनांकडे समान पाहतो. त्यामुळे या घटनेत कुठल्याही पक्षाचा नेता किंवा कार्यकर्ता असला तरी वेगळा न्याय दिला जाणार नाही. जे होईल ते कायदेशीर रित्या होणार आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.पुण्यात झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. या घटना वारंवार होऊ नये. शासन आणि गृह विभाग उपायोजना करत आहे असेही शिंदे म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती सर्व जागा लढवत आहे. नऊ जागा आमच्या असून त्या सर्व जागा आम्ही जिंकणार असल्याचे शिंदे म्हणाले.

आणखी वाचा-विदर्भात पावसाचा ‘येलो अलर्ट’, पण कधीपर्यंत…?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्याचा अधिकार नाही. काँग्रेसच्या काळात कोळसा घोटाळा, टू जी स्कॅम, नॅशनल हेरॉल्ड, यासारखे अनेक घोटाळे झाले आहे. घोटाळ्यांची मालिका इतकी मोठी होती की २०१४ असो की २०१९ मध्ये जनतेने काँग्रेसला घरी बसवले आहे. काँग्रेसने केलेले घोटाळे जनतेसमोर आहे आणि आगामी निवडणुकीत जनता उत्तर देईल. कट कमिशन अँड करप्शन ही काँग्रेसची ही सूत्री होती. २०२४ मध्ये जंग जंग पछाडून मोदींना पराभव करू शकले नाही आणि त्यांच्यावर घोटाळ्याचा डाग लावू शकले नाही. त्यामुळे काँग्रेसला घोटाळ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असेही शिंदे म्हणाले. शिखर बँक घोटाळा प्रकरणी मात्र मुख्यमंत्री यांनी मात्र बोलण टाळले.