अकोला : नवरात्रोत्सवामध्ये जनमानसात वेगवेगळे रंग भरून मानवी जीव नव्या उत्साहात दंग होतो. त्यातच आकाशातसुद्धा २१ व २२ ऑक्टोबरला मृग नक्षत्रातून रंगीबेरंगी उल्कांची उधळण अनुभवता येणार आहे, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली.

आकाशात क्षणार्धात चमकणारी प्रकाशरेखा ज्याला तारा तुटला, असेदेखील म्हणतात. मात्र, ती उल्का असते. आकाशात रोज रात्री वेगवेगळ्या भागांत कमी अधिक प्रमाणात उल्का पडत असतात. पृथ्वी कक्षा आणि उल्कांची कक्षा निश्चित असल्याने वर्षातील ठराविक वेळी ठराविक तारका समुहातून उल्कांचा वर्षाव अनुभवता येतो. सूर्य कुलाचेच घटक असलेले धुमकेतू सूर्य प्रदक्षिणा पूर्ण करताना काही वस्तूकण भ्रमण मार्गावर सोडून जातात. पृथ्वी ज्यावेळी त्यांच्या जवळून जाते किंवा इतर लहानमोठ्या वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ओढल्या जातात आणि वातावरणातील घर्षणामुळे पेट घेतात, त्याच विविधारंगी प्रकाशरेखा नुसत्या डोळ्यांनी पाहता येतात.

हेही वाचा – वर्धा : वादग्रस्त कुलगुरूंचा राजीनामा स्वीकृत, नागपूर आयआयएम निदेशक नवे कुलगुरू

२१ व २२ ऑक्टोबरला मध्यरात्रीनंतर पूर्व आकाशात चार ठळक ताऱ्यांच्या चौकोनात एका सरळ रेषेत तीन तारे दिसतील व तीच काल्पनिक रेषा जरा पुढे वाढविल्यास एक तेजस्वी तारा दिसेल. तोच पृथ्वीवरून दिसणारा सर्वात तेजस्वी तारा व्याध नावाचा आहे. पूर्वेस सुमारे दरताशी २० उल्का पडताना दिसतील, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

हेही वाचा – गीत, निवेदन, चलचित्रातून ‘ऑस्टिओपोरोसिस’ नियंत्रणाचा संदेश; देशात पहिला प्रयोग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृग नक्षत्रात सूर्य येतो, तेव्हा पावसाला सुरुवात होत असते. त्यामुळे बहुतांश लोक या तारका समुहाला ओळखून आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. आकाशप्रेमींनी आकर्षक उल्का वर्षाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले आहे.