‘तूने मेरेको चाकू से मारा था…अब तेरेको मारना है…’ म्हणत एका आरोपीकडून दुसऱ्या आरोपीचा पाठलाग | Loksatta

‘तूने मेरेको चाकू से मारा था…अब तेरेको मारना है…’ म्हणत एका आरोपीकडून दुसऱ्या आरोपीचा पाठलाग

भंडारा जिल्हा न्यायालय परिसरात बुधवारी दुपारी एका आरोपीने दुसऱ्या आरोपीवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायाधीश आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

‘तूने मेरेको चाकू से मारा था…अब तेरेको मारना है…’ म्हणत एका आरोपीकडून दुसऱ्या आरोपीचा पाठलाग
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

भंडारा : ‘तूने मेरेको चाकू से मारा था. अब तेरेको मारना है…’ आणि सुरू होतो पाठलाग. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एकजण वाट दिसेल तिकडे पळत सुटतो. त्याच्या मागे हातात चाकू घेतलेला ‘तो’ असतो. पळणारा थेट न्यायाधीशांच्या कक्षात शिरतो. न्यायाधीशही प्रसंगावधान दाखवतात. पोलिसांना पाचारण करतात आणि आरोपीला अटक होते. हे एखाद्या चित्रपटातील दृश्य नाही. तर भंडारा जिल्हा न्यायालय परिसरात बुधवारी घडलेली घटना आहे. यात पळणारा आणि पाठलाग करणारा दोघेही आरोपी आहेत हे विशेष.

भंडारा जिल्हा न्यायालय परिसरात बुधवारी दुपारी एका आरोपीने दुसऱ्या आरोपीवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायाधीश आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. साद जाहिदजमा कुरेशी (वय २०) असे बुधवारी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या इतर साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम रामटेके आणि साद कुरेशी यांच्यात जुने भांडण आहे. शुभम विरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : देशभरातील ‘एटीएम’ फोडणाऱ्या उत्तर प्रदेशच्या टोळीला नागपूरात अटक

त्यासंदर्भात पेशी असल्याने शुभम हा रितिक वासनिक आणि साहिल बांबर्डे यांच्यासह बुधवारी सकाळी जिल्हा न्यायालयात आला होता. दरम्यान, दुपारी १ वाजताच्या सुमारास साद कुरेशी हा त्याच्या तीन साथीदारांसह न्यायालय परिसरात आला. चाकू घेऊन तो शुभमच्या मागे धावू लागला. या प्रकारामुळे शुभम घाबरला आणि पळत सुटला.धावत असताना तो न्यायाधीशांच्या कक्षात शिरला आणि कुरेशी मागावर असल्याचे त्यांना सांगितले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायाधीशांनी पोलिसांना पाचारण केले.पोलिस येत असल्याचे दिसताच कुरेशी आणि त्याच्या साथीदारांनी पळ काढला. मात्र, न्यायालयाच्या पार्किंगमध्ये कुरेशी याला पकडण्यात पोलिसांना यश आले. तर त्याचे इतर तीन साथीदार पळून गेले. याप्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”

संबंधित बातम्या

“हे फक्त गडकरीच करू शकतात, तो काँग्रेसचा नेता असूनही…”, नाना पाटेकरांचं नागपुरात वक्तव्य
नागपूर जिल्हा परिषदेत निधी अडवून भाजपने केली सत्ताधारी काँग्रेसची कोंडी
अमरावती: पोलीस भरतीचे स्वप्न अधुरे; सरावादरम्यान तरुणीचा अपघाती मृत्यू
पोलीस ठाण्यात चक्क पोलिसच खेळतात जुगार!; व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ
राज्यकर्ते कोणीही असो, ज्या दिवशी शेतकरी आत्महत्या थांबतील …; काय म्हणाले नाना पाटेकर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
शेजारी बसलेल्या शाहरुख खानला ओळखू शकली नाही ‘ही’ अभिनेत्री; नेटकरी म्हणाले…
विश्लेषण: फिफा वर्ल्ड कपमध्ये मोरोक्को, जपान बलाढ्य युरोपिय देशांपुढे आपापल्या गटांत अव्वल कसे राहिले?
“मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजुला उभा राहीन आणि पोलीस पाकीट मारल्याचा…”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
प्लास्टिकचा कचरा द्या आणि मोफत चहा प्या! उदयपूरच्या युवकाचा स्वच्छतेसाठी भन्नाट उपक्रम; पाहा Video
बांगलादेशी आणि रोहिंग्यांबद्दलचं वक्तव्य परेश रावल यांना पडलं महागात; माफी मागूनही तक्रार दाखल