भंडारा : मुरुमाची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत अड्याळ येथील २३ वर्षीय तरुण जागीच ठार झाला तर त्याच्या मित्राचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.पवनी तालुक्यातील अड्याळ जवळ हा अपघात घडला. शुभम चंद्रशेखर हटवार असे मृताचे नाव असून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव वेदांत राजू करंजेकर असे आहे.दोघेही मंढईपेठ अड्याळ येथील रहिवासी आहेत. राजूवर भंडारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ही घटना सोमवार २ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास सोमनाळा-विरली खंदार मार्गावर घडली. शुभम आणि वेदांत हे दोघेही लाखांदूर तालुक्यातील मासळ येथे परीक्षेचा पेपर द्यायला गेले होते. परीक्षा आटोपून दुचाकीने अड्याळ परत येत होते. दरम्यान अड्याळहून ४ किमी अंतरावरील सोमनाळा-विरली खंदार मार्गावर मुरूमाची अवैध वाहतूक करणारा टिप्पर (क्रमांक एमएच ३६ एए ३८७६) येत होता. या टिप्परने शुभमच्या दुचाकीला समोरासमोर घडक दिली. या घटनेत दुचाकीसह शुभम व वेदांत टिप्परमध्ये सापडले. यात शुभमचा जागीच मृत्यू झाला. तर वेदांतचे दोन्ही पाय निकामी झाले. जखमी झालेल्या वेदांतला प्राथमिक उपचारानंतर भंडारा येथे हलवण्यात आले आहे.

मुरूमची अवैध वाहतूक

विरली खंदार परिसरातून मोठ्या प्रमाणात अड्याळ मार्गावर मुरूमची अवैध वाहतूक होत असते. यापुर्वीही तीन अपघात घडले असून यात तिघांचा मृत्यू झाला. आज घडलेल्या घटनेने ग्रामस्थ अधिकच संतापले. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळेच सातत्याने अपघात घडत असून मुरूमच्या अवैध वाहतुकीला केवळ महसूल विभाग दोषी असल्याचे म्हटले.

अन् कुटुंबियांनी फोडला हंबरडा

शुभम हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा आहे. अपघातातील दुर्दैवी मृत्यूने हटवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शुभमचे कुटुंब पोहोचले. त्याचे कलेवर पाहून कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. अपघात झाल्यानंतर टिप्पर चालक तिथून पसार झाला. विशेष म्हणजे घटनेनंतर टिप्पर ही रस्त्याच्या खाली उतरला. अपघाताची माहिती मिळताच अड्याळ येथील संतप्त नागरिकांनी घटनास्थळ गाठले. तसेच विविध मागण्यांची जोपर्यंत पुर्तता होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा घेतला. तरुणाला दिलेला धडक टिप्पर हा भंडारा येथील एका व्यवसायीकाचा असल्याची माहिती आहे. अपघात स्थळी ग्रामस्थांनासह पोलिसांचा फौजफाटा जमला होता. घटनास्थळी नायब तहसीलदार राऊत व मंडळ अधिकारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत पावलेल्या शुभमच्या कुटुंबाला ४० लाखांची आर्थिक मदत द्यावी, अपघातात गंभीर जखमी झालेल्या वेदांतच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचल करून आर्थिक मदत द्यावी. घटनास्थळी नायब तहसीलदार राऊत व मंडळ अधिकारी उपस्थित होते. मृत पावलेल्या शुभमच्या कुटुंबाला ४० लाखांची आर्थिक मदत द्यावी, अपघातात गंभीर जखमी झालेल्या वेदांतच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचल करून आर्थिक मदत द्यावी, घटनास्थळी टिप्पर मालकाला हजर करावे, अशी मागणी केली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मृतदेहाची उचल करू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.