नागपूर: नागपूर ग्रामीण मध्ये सुरू असलेले कारखाने कामगारांच्या सरक्षेकडे दुर्लक्ष करतात हे कारखान्यात अपघात झाल्यावर, निष्पाप कामगारांच्या मृत्यू नंतर लक्षात येते. हे कारखाने दारुगोळा करणारे असो किंवा औषधनिर्मितीचे सर्वच ठिकाणी हा प्रकार घडतो. यात भर पडली ती कामठी तालुक्यातील भिलगाव शिवारातील फार्मासिटिकल कंपनीत झालेल्या स्फोटाची.
जिल्ह्यातील भिलगाव शिवारातील अंकित पल्स अँड बोर्डस प्रायव्हेट लिमिटेड फार्मासिटिकल कंपनीत गरम पाण्याचा रिऍक्टर नोझल पाईपमध्ये स्फोट झाल्याने एक कामगार ठार तर सहा जखमी झाले. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता सुमारास घडली. सुधीर रामेश्वर कालबांडे (४२) रा. दत्तनगर कन्हान असे मृत कामगाराचे नाव आहे.
नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामठी– नागपूर मार्गावर भिलगाव शिवारात अंकित पल्पस अँड बोर्डस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून या कंपनीत फूड प्लस केमिकल्स हार्ट पावडर वॉटर 125 डिग्री तापमाना वर मिक्स करून औषधी तयार करण्याचा कारखाना अनेक वर्षापासून सुरू असून या कारखान्यात एकूण 90 कामगार कार्यरत असून तीन शिफ्ट (पाळीत) कामगार कार्यरत असून आज सकाळी सात वाजता सुमारास पहिल्या स्विफ्ट (पाळीच्या) कार्यप्रणालीला सुरुवात झाली असता कंपनी तीन माळ्यावर कार्यरत असून तिसऱ्या माळ्यावर मशिनवर 7 कामगार कार्यरत होते तिसऱ्या माळ्यावर मॅन्युअल रियाक्टर नौझल पाईप ब्लास्ट भष्ट झाल्याने उकळते गरम (केमिकल )पाणी सात कामगाराच्या अंगावर पडल्याने सुधीर रामेश्वर काळपांडे वय 42 वर्ष राहणार दत्तनगर तालुका पारशिवनी, दिनेश टेंभुरणे वय 60 वर्ष राहणार इंदोरा नागपूर ,मंगेश राऊत वय 32 वर्ष राहणार हुडकेश्वर नागपूर , युनूस खान मेहबूब खान 38 वर्ष राहणार कामठी , स्वप्नदीप प्रदीप वैद्य वय 46 वर्ष राहणार इंदोरा नागपूर, आशिष रमेश वाडकुळे वय 35 कान्द्री कन्हान तालुका पारशिवनी ,गणेश रामदास वानखेडे वय 55 वर्ष सुंदर नगर भांडेवाडी नागपूर हे सर्व गंभीर जखमी झाले असता त्यांना कंपनी व्यवस्थापनाने कामठी -कळमना मार्गावरील सिटी हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता दुपारी 1 वाजता सुमारास सुधीर रामेश्वर काळबांडे वय 42 वर्ष दत्तनगर कन्हान तालुका पारशिवनी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला बाकी सर्व कामगाराची प्रकृती गंभीर असून त्यांचे वर कामठी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती तालुका प्रशासनाला मिळाली असता तहसीलदार गणेश जगदाळे, पोलीस उपयुक्त निकेतन कदम ,सहाय्यक पोलीस उपायुक्त विशाल शिरसागर, नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे ,पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र तिवारी,भिलगाव च्या सरपंच भावना फालके घटनास्थळी जाऊन पहाणी करून खाजगी रुग्णालयात जाऊन जखमेची विचारपूस केली दिनेश टेंभुर्णे , व मंगेश राऊत या कामगारांची प्रकृती गंभीर असून त्यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे कामगार सुधीर रामेश्वर काळपांडे यांचे मृत्यूची माहिती होताच पत्नी किरण काळपांडे ,भाऊ संदीप काळबांडे ,वडील रामेश्वर कालबांडे दवाखान्यात धायमकलून रडत होते मृतकाला दहा वर्षाची मुलगी मुलगा व बारा वर्षाची मुलगी आहे सर्वच जखमी कामगाराचे नातेवाईक खाजगी रुग्णालयात मोठ्या संख्येने गोळा झाले होते त्यांनी मृतकाच्या परिवाराला व जखमीच्या नातेवाईकांना कंपनी व्यवस्थापक व शासनाकडून आर्थिक भरपाई देण्याची मागणी केली आहे
कंपनीत उत्पादन कार्यप्रणाली प्रथम , दुसऱ्या, तिसऱ्या माळ्यावर होत असून कामगारांसाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपयोजना कंपनी व्यवस्थापना कडून नसल्याचे काही कामगारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले असून कंपनी व्यवस्थापनाबद्दल कामगाराच्या मनात खदखद असल्याची प्रतिक्रिया काही कामगारांनी दिली आहे.