अमरावती: वन्‍यप्राण्‍यांमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टाळण्‍यासाठी शेतातील तारांच्‍या कुंपणामध्‍ये जिवंत विद्युत प्रवाहित केल्‍यामुळे अनेकांना नाहक जीव गमवावा लागतो. अशीच एक घटना जिल्‍ह्यातील मंगरूळ दस्‍तगीर पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील सोनोरा काकडे शेत शिवारात उघडकीस आली आहे.

गोपाल मधुकर राऊत (४२, रा. आष्‍टा) असे मृताचे नाव आहे. गोपाल यांचा मृतदेह गेल्‍या २१ सप्‍टेंबर रोजी सोनोरा काकडे येथील एका शेतात आढळून आला होता. आरोपी अनुप देवदास मानकर (३५, रा. सोनोरा काकडे) याने आपल्‍या शेतातील तारेच्‍या कुंपणात जिवंत वीज प्रवाह सोडला होता. गोपाल राऊत हे शेतात गेल्‍यानंतर त्‍यांचा संपर्क कुंपणाशी झाला आणि त्‍यांचा विजेच्‍या धक्‍क्‍याने मृत्‍यू झाला.

हेही वाचा… सिंदेवाहीत शेतात हत्ती मृतावस्थेत आढळला; वन खात्यात खळबळ

या प्रकरणी अमित बाबाराव राऊत (३६, रा. आष्‍टा, ता. धामणगाव रेल्‍वे) यांनी मंगरूळ दस्‍तगीर पोलीस ठाण्‍यात फिर्याद दाखल केली होती. पोलीस चौकशी आणि वैद्यकीय अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतर आरोपी अनुप मानकर याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

हेही वाचा… नागपूर: मोबाईलसाठी ११ वर्षीय मुलाची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंपणाच्‍या तारांमध्‍ये विद्युत प्रवाहित केल्‍यामुळे शेतकरी, गुराखी आणि शेतमालकांचे जीव धोक्‍यात येत आहेत, त्‍यामुळे कुणीही कुंपणाला विद्युत तारा जोडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.