नागपूर : चीनसह जगातील काही देशात करोनाने डोके वर काढले असतानाच नागपूर मात्र करोनामुक्तीच्या मार्गावर असल्याचे सुखद चित्र आहे. जिल्ह्यातील शहरी भागात सध्या केवळ १ सक्रिय रुग्ण असून नवीन रुग्ण आढळत नसल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे.

नागपूर विमानतळावर चाचणी सुरू आहे. मध्यंतरी विदेशातून आलेल्या तरुणामध्ये करोनाचे निदान झाल्याने चिंता वाढली होती. परंतु त्यानंतर शहरात सातत्याने रुग्ण कमी होऊन सध्या शहरी भागात केवळ एकच सौम्य लक्षणाचा रुग्ण आहे. दरम्यान, शहरात आजपर्यंत करोनाचे ४ लाख ५ हजार ८६२ रुग्ण, ग्रामीणला १ लाख ७१ हजार ५५५, जिल्ह्याबाहेरील ९ हजार ९९६ असे एकूण ५ लाख ८७ हजार ४१३ रुग्ण आढळले.

Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

त्यापैकी शहरातील ३ लाख ९९ हजार ७९९, ग्रामीणला १ लाख ६८ हजार ९२७, जिल्ह्याबाहेरील ८ हजार ३२८ असे एकूण ५ लाख ७७ हजार ५४ रुग्ण करोनामुक्त झाले. तर शहरात आजपर्यंत ६ हजार ६१, ग्रामीणला २ हजार ६२८, जिल्ह्याबाहेरील १ हजार ६६९ अशा एकूण १० हजार ३५८ रुग्णांचा मृत्यू झाला.