नागपूर : लहानपणापासूनच तुटलेला तारा पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. वर्षांतील ठरलेल्या दिवशी उल्कापात बघणे ही एक अप्रतिम संधी असते. त्यासाठी शहरी वीजदिव्यांच्या प्रकाशापासून दूर काळोख गाठावा लागतो. जेमिनिड उल्कापात हा सहज खात्रीलायक दिसणारा सर्वाधिक तेजस्वी असून तो ३२०० फीथॉन या लघुग्रहाच्या कचऱ्यातून निर्माण होतो. तो उत्तर-पूर्व आकाशात जेमिनीड तारका समूहातून निघताना दिसतो. या उल्कापाताच्या साधारण दोन दिवस असलेल्या परमोच्च बिंदूपैकी येत्या १४ डिसेंबरला रात्री सात ते मध्यरात्रीपर्यंत दिसण्याची सर्वोत्तम शक्यता चंद्रोदय खूप आधी असल्याने राहील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उल्कापात म्हणजे तारा तुटणे नसून अवकाशातील धूमकेतूच्या मागे राहिलेल्या तुकडय़ांच्या पट्टय़ातून पृथ्वी जात असताना तिच्याकडे गारगोटीएवढे लहान तुकडे वेगाने ओढले जातात. या तुकडय़ांचे वातावरणातील कणांसोबत घर्षण होऊन झळाळणारी प्रकाशरेषा म्हणजे उल्कापात आहे. फक्त काहीच तुकडे जुळून पृथ्वीवर पोहोचतात आणि त्या उल्का असतात. पृथ्वीपासून साधारणत: १०० किमी उंचीवर घडणारा उल्कापात त्याच्या पार्श्वभूमीवर करोडो किमी दूर असणाऱ्या विशिष्ट तारका समूहातून निघाल्यासारखा दिसतो व त्यावरून ओळखला जातो. पौर्णिमा किंवा पावसाळय़ात उल्कापात दिसत नाही. त्यादृष्टीने भारतात दिसण्यासाठी उत्तर गोलार्धात ठळक दिसणारे हिवाळय़ातील जेमिनिड आणि अॅ्क्वॉरिड उल्का वर्षांव अधिक महत्त्वाचे आहेत. दोघांमध्ये उल्का दिसण्याचा वेग सारखाच असला तरी जेमिनिडमधील उल्का अधिक तेजस्वी असतात. जेमिनिडपेक्षा किंचित कमी तेजस्वी असलेला क्वॉड्रान्टिड उल्का वर्षांवचा परमोच्च बिंदू (साधारणत: ताशी १००) काही तासांचाच (आठ) असल्याने तो गाठण्याची खात्री जेमिनिडपेक्षा कमी असते. तो येत्या चार जानेवारीला पहाटे पूर्वी १.३० नंतर सर्वोत्तम दिसण्याची शक्यता आहे. तो मध्यरात्री नंतर उत्तर-पूर्व आकाशात येणारा उसरा मेजर/ग्रेट बिअर तारका समूहचा भाग असलेल्या सप्तर्षीखालून निघतांना दिसेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opportunity meteor showers winter ysh
First published on: 02-12-2021 at 00:32 IST