पद्मश्री पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले असून हा पुरस्कार माझा नाही तर झाडीपट्टी रंगभूमीचा असल्याचे मत झाडीपट्टी रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत परशुराम खुणे यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले असून, त्यात झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंत परशुराम खुणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी लोकसत्ताने त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, माझ्या जीवनातील हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. माझ्या नाट्य क्षेत्रातील गुरू आणि आईवडिलांच्या आशीर्वादामुळे येथपर्यंत पोहचू शकलो. या पुरस्कारात त्यांचा मोठा वाटा आहे. शिवाय ज्या झाडीपट्टी रंगभूमीतील मायबाप रसिकांनी माझ्यावर प्रेम केले त्यांचा हा पुरस्कार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कुरखेडा तालुक्याच्या गुरनुली गावातील डॉ. परशुराम खुणे गेल्या ४० वर्षांपासून झाडीपट्टीच्या रंगभूमीवर रसिकप्रिय विनोदी नट आहेत. आजपर्यंत झाडीपट्टीच्या रंगभूमीवर आठशेवर नाटकातून विविध भूमिका साकारल्या आहेत. विशेषत: ‘झाडीपट्टीतील दादा कोंडके’ अशीही त्यांची ख्याती आहे. डॉ. खुणे १५ वर्षे गुरनुलीचे सरपंच व ५ वर्षे उपसरपंच होते. १० वर्षांपासून झाडीपट्टी कला मंचचे ते अध्यक्ष असून अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्यही करीत आहेत. त्यांना १९९१ ला महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार, १९९२ ला जादूगार सुनील भवसार स्मृती पुरस्कार, १९९५ ला श्यामराव बापू प्रतिष्ठानच्या कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा – वाशीम: माझ्या मारहाणीचा ‘व्हिडीओ व्हायरल‘ झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थोपटली पाठ, आमदार संतोष बांगर म्हणाले, महिलांवर…

हेही वाचा – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, “महाविकास आघाडीत कितीही पक्ष सहभागी झाले तरी…”

डॉ. खुणे यांच्या सिंहाचा छावा, स्वर्गावर स्वारी, लग्नाची बेडी, एकच प्याला, मरीमायचा भुत्या, लावणी भुलली अभंगाला, मी बायको तुझ्या नवऱ्याची, एक नार तीन बेजार, बायको कामातून गेली, नाथ हा माझा, इत्यादी नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यांना नुकतेच नाट्यक्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ‘गडचिरोली गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padma shri award to parashuram khune nagpur vmb 67 ssb
First published on: 25-01-2023 at 22:37 IST