वर्धा : वैद्यकीय शिक्षणाचा आता अफाट विस्तार होत आहे. विविध शाखा या शिक्षणाच्या तयार होत असून व्यावसायिक संधी सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होवू लागत आहे. मुख्य आरोग्य सेवेत डॉक्टरी सल्ला व निदान महत्वाचे त्यासोबतच शुश्रुषा, औषध, रक्त व अन्य तपासणी स्वरूपात रुग्ण सेवा होत असते त्यासाठी नर्सिंग, फिजिओथेरेपी व अन्य स्वरूपात शिक्षण उपलब्ध आहेत. त्यास पॅरा मेडिकल शिक्षण म्हणून ओळखल्या जाते. वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवेच्या अनुषंगाने ही विद्या शाखा आहे. त्यासाठी विशेष कायदा पण करण्यात आला.
वैद्यकीय शिक्षणात पॅरा मेडिकल हा परिचित शब्द. आता या मुख्य वैद्यकीय शिक्षणात अनुषंगिक सेवा देणाऱ्या विद्या शाखाची नव्याने शब्दावली तयार केल्या जात आहे. वैद्यकीय शिक्षणात परावैद्यकीय शाखेसाठी आता सहयोगी आरोग्यसेवा असा शब्दप्रयोग करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. केंद्राच्या आरोग्य मंत्रालया अंर्तगत कार्यरत राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्यसेवा आयोगाने हे निर्देश दिले आहे. वैद्यकीय सेवेत मुख्य वैद्यकीय शिक्षणाशिवाय अन्य पुरक अभ्यासक्रम असतात. त्यांना परावैद्यकीय म्हणजेच पॅरामेडीकल शाखा म्हणून ओळखल्या जातात. त्यात भौतिकोपचार, नर्सींग, वैद्यकीय तंत्रज्ञ व अन्य अभ्यासक्रमांचा समावेश होतो. त्यासाठी राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्यसेवा आयोग २०२१ हा कायदा तयार झाला. या अनुषंगीक अभ्यासक्रमांचे मानांकन व ओळख निर्माण करण्यासाठी हा शब्दबदल करण्यात आला आहे.
आरोग्यसेवा पुरविण्यात हे अन्य घटक महत्वाचे असतात. त्यांची शब्दावली तयार करण्यासाठी परावैद्यकीय शब्द बदलण्यास आल्याचे आयोगाने स्पष्ट केले.हा बदल या पुढे अंमलात आणण्याचे निर्देश आयोगाने सर्व राज्य सरकारे, संबंधीत विद्यापीठे, वैद्यकीय संस्थांना दिले आहे. पॅरामेडीकल ऐवजी सहयोगी आणि आरोग्यसेवा हा शब्द वैद्यकीय संस्थांच्या पत्रव्यवहार, पदव्या, प्रशिक्षण, शैक्षणीक साहीत्य, सरकारी पत्रव्यवहार व अन्य व्यवहारात उपयोगात आणण्याची सूचना आहे. हा बदल तात्काळ अंमलात आणण्याचेही निर्देश आहे.
अधिष्ठाता डॉ. श्याम भूतडा म्हणतात की असा बदल करण्यामागे नेमके कारण काय असावे हे स्पष्ट होत नाही. पण विविध वैद्यकीय शाखा नव्याने अस्तित्वात येत आहेत. त्यासाठी नवे शब्दप्रयोग केल्या जातात. पण ते प्रामुख्याने इंग्रजीत असतात. या आदेशातूनच स्पष्ट करण्यात आले आहे की ओळख निर्माण करण्यासाठी हे बदल होत आहे. केंद्राच्या आरोग्य मंत्रालयातर्गत हे सूचित झाले असल्याने बदल अंमलात येतीलच.