नागपूर : हैदराबादकडून दिल्लीकडे जात असलेल्या दक्षिण एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाचा सहप्रवाशांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. नागपूर लोहमार्ग पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. पुढील तसास सुरू आहे. दक्षिण एक्सप्रेसच्या सर्वसाधारण डब्यातून प्रवास करीत असलेल्या सशांखला (वय २१)  चौघांनी मारहाण केली. त्याला गंभीर दुखापत झाली. तो बुशुद्ध झाला आणि मृत पावला. ही घटना धावत्या गाडीत गुरुवारी रात्री ३ च्या सुमारास घडली. रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील लखिमपूर खैरी येथील सशांख हा एका मित्रसोबत प्रवास करीत होता. त्याच डब्यात हैदराबाद येथून नागपूरला चौघेजण येत होते.

हेही वाचा >>> सावधान! राज्यात जलजन्य आजाराचे १४ बळी; सर्वाधिक मृत्यू अतिसारामुळे…

मध्यरात्री प्रवाशी झोपेत असताना आरोपींनी काही प्रवाशांचे मोबाईल फोन आणि पैसे चोरी केले. हे बघून सुशांखने हटकले. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी  सुशांकला जबर मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. एका आरोपीने सशांखच्या पोटावर जोरदार बुक्की मारली. त्यामुळे त्याला उलटी झाली आणि तो बेशुद्ध पडला. बल्लारशाह ते नागपूरच्या दरम्यान तो निचपत पडला होता. या घटनेमुळे इतर प्रवासी घाबरले. कोणीही सुरक्षा यंत्रणेला कळवले नाही. बल्लारपूरच्या आधीच ही घटना घडली होती. गुरुवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर ही गाडी पोहचली. त्यानंतर गस्तीवरील रेल्वे सुरक्षा दलास माहिती देण्यात आली. लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफने मृतदेह ताब्यात घेतला आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवले. आरोपी हैदराबादहून नागपूर येत होते. ताजाबाद येथे दर्शनाला येत असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.