यवतमाळ : इयत्ता दहावीच्या परीक्षेला आज, शुक्रवारपासून सुरुवात झाली. कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला. मात्र, पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील शिवछत्रपती केंद्रावर सकाळी ११ वाजता मराठीचा पेपर सुरू होताच अवघ्या अर्ध्या तासात भ्रमणध्वनीवरून सार्वत्रिक झाला. जिल्ह्यात पहिल्याच दिवशी दहावीच्या परीक्षेला गालबोट लागल्याने खळबळ उडाली.

पाटणबोरी येथील शिवछत्रपती केंद्रावर पेपर सुरू होताच भ्रमणध्वनीवरून सार्वत्रिक होऊ लागला. याची माहिती पांढरकवडाचे गटशिक्षणाधिकारी विकास मुळे यांना समजताच त्यांनी साडेअकरा वाजता आपल्या पाच सहकाऱ्यांसह परीक्षा केंद्रावर भेट दिली. तेथील सर्व परिस्थितीचे अवलोकन करून सर्व रूमवरील पर्यवेक्षकांची जबानी घेण्यात आली. संपूर्ण चौकशी करून अहवाल बोर्डाकडे सादर करणार आहे. सद्यस्थितीत येथे कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळला नाही. मराठीचा पेपर सार्वत्रिक झाला हे नक्की मात्र कुठून झाला, याची चौकशी पोलीस करीत आहेत, असे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा – तोतयागिरी! वनरक्षकाच्या चाचणीत धावला ‘डमी’ उमेदवार…

हेही वाचा – सामूहिक बलात्कारामुळे शिक्षण सुटले, न्यायालय म्हणाले…

परीक्षा झाल्यानंतर पांढरकवडा पोलिसांनी केंद्र संचालक सर्व रूमवरील पर्यवेक्षक, शालेय कर्मचारी, लिपिक, शिपाई आदींची जबानी घेतली. याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली