महाराष्ट्रात सत्तांतर होऊन ८ महिने लोटले. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाला या सत्तांतराची बहुदा माहिती नसावी! कारण, या विभागाच्या फिरता दवाखाना वाहनावर अजूनही उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असल्याचे माहिती फलक (स्टीकर्स) दिसून येत आहे. पशुसंवर्धन विभाग अद्ययावत कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा- VIDEO : बापरे! अमरावतीत विद्यार्थ्यांनी भरलेली ट्रॅक्‍टर ट्रॉली उलटली; २२ जण जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज पशुसंवर्धन विभागाला भेट दिली असता, कार्यालयाच्या आवारात ही वाहने दिसून आली. त्यावर वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंऐवजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र अजूनही कायम आहे. या संदर्भात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले यांना विचारणा केली असता, सदर वाहन १७ महिन्यांपूर्वी आमच्या विभागाला मिळाले. राज्यात सत्तांतर झाले हे जरी खरे असले तरी वाहनावर उमटलेले तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र बदलण्याकरिताचे निकष काय आहेत, याबद्दल मला सध्या तरी माहिती नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून यावर त्यांचे मार्गदर्शन घेऊ आणि त्यांच्या आदेशानुसारच पुढे काही करता येईल, असे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.