नागपूर: पुण्याहून लखनऊला विमान प्रवास करणाऱ्या यात्रेकरूची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत हे विमान नागपूरला उतरवण्यात आले. शनिवारी ही घटना घडली.

पुण्याहून लखनऊला जाणाऱ्या इंडोगोच्या विमानात प्रवास करणाऱ्या यात्रेकरूच्या संदर्भात ही घटना घडली. मोहंमद अन्सारी हे या विमानातून प्रवास करीत होते. त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. याची माहिती विमनातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचाराची गरज होती. त्यामुळे विमान तत्काळ नागपूर विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी सूचना नागपूर विमानतळ प्रशासनाला देण्यात आली. त्यांनी रुग्णवाहिकेसह अन्य सुविधा तत्काळ विमानतळावर उपलब्ध करून दिली.

हेही वाचा… सर्व ऐतिहासिक स्थळांवरील अतिक्रमण हटवण्यात येईल – फडणवीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपात्कालीन स्थितीत विमान नागपूर विमानतळावर उतरल्यावर अन्सारी यांना तत्काळ रुग्णावाहिकेतून एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती अन्सारी यांच्या नातेवाईकांना देण्यात आली.