लोकसत्ता टीम

नागपूर : वर्धा येथील प्रचारसभा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री नागपूरमध्ये दाखल झाले असून त्यांचा राजभवनात मुक्काम आहे. शनिवारी सकाळी ते भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत.

आणखी वाचा-मतदान केंद्राबाहेरच भाजपकडून प्रचार; प्रशासन बघ्याच्या भूमिकेत, काँग्रेसची आयोगाकडे तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भ दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी दुपारी पाच वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. तेथून ते हेलिकॉप्टरने वर्धा जिल्ह्यात प्रचारसभेला गेले. ती आटोपून ते रात्री नागपूरला परत आले. त्यांचा राजभवनावर मुक्काम होता. शनिवारी सकाळी ९ वाजता ते नांदेड व परभणी येथे आयोजित प्रचारसभेसाठी रवाना होतील. तत्पूर्वी ते भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. यापूर्वीही मोदीं यवतमाळच्या सभेसाठी नागपूरला आले असता विमानतळावर कार्यकर्त्यांची भेट घेतली होती.