भारतीय जनता पक्षाचे उमरेडचे महामंत्री राजू ढेंगरे यांचा दिवाळीला बोनस न दिल्यामुळे संतप्त झालेल्या दोन नोकरांनी गळा चिरून खून केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपींना मध्यप्रदेशातील मंडला गावातून अटक केली. विशेषकुमार रामदास रघुवंशी (३३, मंडला) आणि आदी चंद्रमणी नायक (३०, बनपल्ली, ओडिशा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा >>> पतीवर उपचार सुरू असताना पत्नीने रुग्णालयातच घेतला गळफास

राजू भाऊराव ढेंगरे हे भाजपचे पदाधिकारी असून त्यांचा कुही फाटय़ाजवळ राजू नावाने ढाबा आहे. आरोपी विशेषकुमार रघुवंशी आणि आदी नायक हे दोघेही ढाब्यावर पोळ्या बनवण्याचे आणि वेटरचे काम करीत होते. दोन्ही नोकरांना दिवाळीला आपापल्या राज्यात घरी कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करायची होती. त्यामुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी त्यांनी ढाबामालक राजू ढेंगरे यांना पगार आणि दिवाळीचा बोनस मागितला. ढेंगरे यांनी दोघांनाही उद्या पैसे देण्याचे आश्वासन दिले. दिवाळीच्या आदल्या दिवशी ग्राहकी संपल्यानंतर जामकर नावाच्या पोळ्या लाटणाऱ्या महिलेला ढेंगरे यांनी गावात सोडले व रात्री दीड वाजता ते परत आले. त्यांना दोन्ही नोकरांनी गावी जाऊन कुटुंबीयांसाठी खरेदी करायची असल्याचे सांगून दिवाळी बोनस आणि पगार मागितला. मात्र, ढेंगरे यांनी टाळाटाळ करून पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या दोन्ही नोकरांनी ढेंगरे यांचा गळा आवळला आणि त्यानंतर गळा चिरून खून केला.

त्यानंतर ढेंगरे यांची कार चोरून पळ काढला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विहीरगावजवळ त्या कारला अपघात झाला. दोन्ही आरोपींनी कार सोडून ट्रकला हात दाखवला व मध्यप्रदेश गाठले. विशेषकुमारच्या घरी दोघेही लपून बसले. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर अधीक्षक डॉ. संदीप पखाले, सहायक अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे ओमप्रकाश कोकाटे, राजीव कर्मलवार, ठाणेदार प्रमोद घोंगे, नितेश डोर्लीकर यांच्या पथकाने दोनही आरोपींना अटक केली.