लोकसत्ता टीम

बुलढाणा: बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत असल्याने आपापल्या कामात व्यस्त यंत्रणांची एका अफवेने चांगलीच धावपळ आणि दमछाक झाली. ‘सोशल मीडिया’वरील तब्बल साडेचार कोटी रुपयांची रक्कम मेहकरमध्ये जप्त केल्याचे व तीन शिवसैनिकांना ताब्यात घेतल्याच्या मजकूर त्यामध्ये होता. दरम्यान ही ‘पोस्ट’ यंत्रणांच्या व पोलीस विभागाच्या निदर्शनास आल्यावर सर्वांची धावपळ उडाली.

वरिष्ठ अधिकांऱ्यांचे फोन सुरू झाले. खासदार जाधव यांच्या गृहक्षेत्रात ही कथित घटना घडल्याने(!) विरोधक ही जागृत झाले. दरम्यान तांत्रिक व नियमित तपासात ही ‘फेक न्यूज’ असल्याचे स्पष्ट झाले.

आणखी वाचा-६० मुलांसह बापाने केले मतदान; पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्‍या आश्रमाची ऐतिहासिक नोंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस अधीक्षक कडासने यांनी अशी कोणतीही घटना जिल्ह्यात झाली नाही. कोणताही गुन्हा दाखल झाला नाही, ‘व्हायरल’ होणारा मजकूर हा ‘फेक’ असल्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी सांगितले. ‘मेसेज व्हायरल’ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, मॅसेज तयार करणाऱ्यांचा शोध ‘सायबर सेल’ कडून घेण्यात येत असल्याचेही कडासने यांनी सांगितले .