बुलढाणा : उद्या बुधवारी बुलढाण्यात आयोजित मराठा क्रांती मोर्चा अभूतपूर्व अन सात वर्षांपूर्वीच्या मोर्च्यापेक्षा वरचढ ठरणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. यामुळे गर्दीचे नियंत्रण व कायदा, सुव्यस्थेच्या दृष्टीने आव्हान असणाऱ्या या मोर्च्यासाठी पोलीस विभागाने कडक बंदोबस्तरुपी चक्रव्युहाचे नियोजन केले आहे.

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित असलेले पोलीस अधीक्षक सुनील कडासने हे स्वतः बंदोबस्तासाठी मैदानात (रस्त्यांवर) उतरणार आहे. त्यांच्या दिमतीला ५ पोलीस उपअधीक्षक राहणार असून चार राज्यमहामार्गवरून शहरात येणारे व बुलढाण्यातील सकल मराठा बांधव यामुळे निर्माण होणाऱ्या भगव्या वादळाला ‘शांत’ ठेवण्याची जवाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. ५ उपविभागातील २० पोलीस निरक्षक, ४४ पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक बंदोबस्ताची धुरा सांभाळणार आहे. त्यांना ६६२ पुरुष व १६५ महिला कर्मचाऱ्यांकडून बंदोबस्त करून घ्यावा लागणार आहे. याशिवाय ५५ वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय ४३ साध्या वेषातील खुफिया आणि १५ कॅमेरे यांची मोर्च्यावर करडी नजर राहणार आहे. आणीबाणीच्या परिस्थितीसाठी ३ दंगा काबू पथक सज्ज राहणार आहे.

Mohadi taluka, bridge, washed away,
बापरे… चक्क पूल वाहून गेला! १८ लाखांचा खर्च अन् १८ आठवड्यांच्या आतच…
Telangana’s ‘Bartan’ Bank
‘बर्तन बँक’ म्हणजे नेमके काय? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी का केला त्याचा उल्लेख?
A History of Geography A Rainy Road to Prosperity
भूगोलाचा इतिहास: समृद्धीचा पर्जन्यमार्ग
Singletoli, person attacked, weapon,
गोंदिया : सिंगलटोली संकुलात एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला
Sadhu Vaswani bridge, Demolition,
पन्नास वर्षांपूर्वीचा साधू वासवानी पूल इतिहासजमा, पुलाच्या पाडकामाला प्रारंभ; कोरेगाव परिसरातील वाहतुकीची कोंडी सुटणार
Mhasrul, Murder, old woman,
नाशिक : म्हसरुळमध्ये वृद्धेची हत्या, संशयित ताब्यात
Salman Khan Firing Case News
सलमान खानच्या हत्येसाठी २५ लाखांची सुपारी अन् पाकिस्तानातून शस्त्र मागवण्याचा होता कट, आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर
Kidnap, boy, Nandivali,
कल्याणमध्ये नांदिवलीतून अल्पवयीन गुराख्याचे अपहरण

हेही वाचा – नागपूर: आंतरभारती आश्रमाचे संस्थापक डॉ. भाऊसाहेब झिटे यांचे निधन

हेही वाचा – महागाईचा भस्मासूर! आता तूर डाळीने वटारले डोळे, किलोला तब्बल १७५ रुपये दर

समन्वयकसोबत चर्चा

आज दुपारी पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी आपल्या दालनात निवडक समन्वयक व आयोजकांशी विचारमंथन केले. त्यांनी मोर्च्याची रुपरेषा, स्वरूप, नियोजन समजून घेतले. तसेच मोर्चा सुरळीत कसा पार पडेल यादृष्टीने विचारविनिमय करून आयोजकांची मते जाणून घेतली.