scorecardresearch

वर्धा : अबब… तब्बल शंभर संघटना झाल्या शेतकऱ्यांसाठी संघटित, उद्देश काय? वाचा…

भाजपा सोडून सर्व प्रमुख पक्ष तसेच बीआरएस, आम आदमी पक्ष, माकप हे शेतकऱ्यांसाठी आंदोलनात उतरणार. शिवाय विविध शेतकरी संघटना तसेच शहरातील बहुतांश स्वयंसेवी संघटना या आंदोलनात उतरत आहेत.

farmers organizations march wardha
वर्धा : अबब… तब्बल शंभर संघटना झाल्या शेतकऱ्यांसाठी संघटित, उद्देश काय? वाचा… (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

वर्धा : शेतकऱ्यांच्या समस्या सुटता सुटत नाही म्हणून विविध राजकीय पक्ष तसेच शेतकरी संघटना नेहमी आवाज उठवीत असतात. पण हा विखुरलेला स्वर जर एकत्र आला तर आवाज गुंजनारच. हेच ध्येय ठेवून भाजपा सोडून सर्व प्रमुख पक्ष तसेच बीआरएस, आम आदमी पक्ष, माकप हेपण आंदोलनात उतरणार. शिवाय विविध शेतकरी संघटना तसेच शहरातील बहुतांश स्वयंसेवी संघटना या आंदोलनात उतरत आहेत.

हेही वाचा – गोंदिया : चिचगावटोल्यातील निर्माणाधीन जलकुंभ जमीनदोस्त, कारण काय? जाणून घ्या..

youth congress protest in chandrapur, youth congress shivani wadettiwar chandrapur, congress leader vijay wadettiwar
चंद्रपूर महापालिका प्रशासनाच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन
Vijay Vadettivar warned officials
चंद्रपूर : चिरीमिरीसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची वडेट्टीवारांकडून कानउघाडणी
Maratha Kranti Morcha a hunger strike by the Maratha community in pune
बाणेर, बालेवाडी, औंध भागात बंदला संमिश्र प्रतिसाद; मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाकडून लाक्षणिक उपोषण
obc community start agitation in nagpur
बैलजोडीचे पूजन करून ओबीसींचे आंदोलन; विविध संघटनांचा वाढता पाठिंबा

हेही वाचा – बुलढाणा : …अन् म्हणे गतिमान सरकार! जुलै महिन्यातील अतिवृष्टीची मदत ऑक्टोबरमध्ये!

५ ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता हे सर्व बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान मार्च काढणार आहे. पिकांची नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळावी, वर्तमान पीक विमा योजना रद्द करीत शेतकरी सानुग्रह योजना लागू करावी, कंत्राटी पद्धत बंद करावी व अन्य मागण्या आहेत. हा आक्रोश मोर्चा यशस्वी होणार. समाजातील सर्व पिचलेले घटक सरकारला जाब विचारणार असल्याचे एक संयोजक अविनाश काकडे म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Political parties and farmers organizations will take out a march in wardha city for the welfare of farmers pmd 64 ssb

First published on: 04-10-2023 at 13:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×