चंद्रपूर : साखरवाही येथील जनता विद्यालयात इंग्रजी विषयाचे शिक्षक असलेले भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बबनराव बोढे त्यांनी त्यांच्या जागेवर १५ हजार रूपये महिन्याने त्याच शाळेत एका खासगी शिक्षकाची नियुक्ती केली आहे. स्वत:च्या राजकारणासाठी बोढे यांनी हा प्रताप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 या प्रकरणी शिक्षक बोढे यांच्यासह मुख्याध्यापिका व शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाचालकावर कारवाई करावी अशी मागणी घुग्घुस शहर कॉग्रेसचे अध्यक्ष राजू रेड्डी यांनी केली आहे. चंद्रपूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेत राजु रेड्डी यांनी या जिल्ह्यात चांदा शिक्षण प्रसारक मंडळातर्फे जनता विद्यालय या नावाने अनेक शाळा सुरू आहेत. या शाळांपैकी चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस व साखरवाही येथील जनता विद्यालय या शाळेत भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे तथा जिल्ह्यातील भाजपशी संबंधित नेत्यांपैकी एकाचे कुटुंबातील सदस्य शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मागील काही वर्षांपासून बोढे शाळेत नियमित गैरहजर आहेत.

vidarbh economic development marathi news loksatt
तांदळाच्या प्रजातींवर संशोधन संस्थेसाठी ‘वेद’ आग्रही
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
ED claim in court in Delhi liquor scam case that crime is impossible without Sisodian  participation
सिसोदियांच्या सहभागाशिवाय गुन्हा अशक्य! दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा

हेही वाचा >>> नागपूर : महिलेवर सामूहिक बलात्कार करून खून, एका नराधमाचा मृतदेहावरही अत्याचार

मात्र, शाळेतील हजेरी बुकावर त्यांच्या स्वाक्षरी आहेत. जिल्ह्यात भाजपची सभा, संमेलन, आंदोलन किंवा इतर कुठलाही कार्यक्रम राहिला की बोढे त्याला हजर असतात, मात्र त्याच वेळी शाळेतही ते हजर असतात, एकच व्यक्ती दोन ठिकाणी कसा हजर राहू शकतो, असा प्रश्न राजु रेड्डी यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी रेड्डी यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा व शिक्षणाधिकारी यांच्याकडे, लेखी तक्रार केली आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनाक्रमाचे चित्रिकरणही रेड्डी व सहकाऱ्यांनी केले आहे.

हेही वाचा >>> नागपूर : आचारसंहितेचा फटका, चर्चेविनाच विकास आराखडा मंजूर होण्याची शक्यता

दोन दिवसांपूर्वी रेड्डी यांनी साखरवाही येथील जनता शाळेला भेट दिली. तेव्हा शिक्षक बोढे हे शाळेत गैरहजर होते. बोढे नवव्या वर्गाला शिकवितात. त्या वर्गावर जावून बघितले असता त्यांचा इंग्रजी विषयाचा वर्ग शुभम अशोक कोयाडवार हा शिकवणी वर्ग घेणारा खासगी शिक्षक घेत होता. त्याला विचारणा केली असता, चित्रीकरण सुरू असल्याचे लक्षात येताच त्याने घटनास्थळाहून पळ काढला.

हेही वाचा >>> नागपूर : मुन्ना यादवच्या मुलांचा गडकरींच्या खासदार क्रीडा महोत्सवात हैदोस

 वर्गातील विद्यार्थ्यांना विचारले असता विवेक बोढे या शिक्षकाला आम्ही अजून बघितलेच नाही, असे विद्यार्थी सांगत आहेत. विशेष म्हणजे बोढे यांना ७५ हजार रूपये शासन पगार देते. शासनाचा पगार घेवूनही बोढे दिवसभर राजकारण करतात, विद्यार्थ्यांना शिकवित नाही, शाळेत गैरहजर राहतात. तेव्हा अशा शिक्षकावर कडक कारवाई करावी अशीही मागणी पालकांनी केली आहे. या प्रकरणाची शैक्षणिक व राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणाची माहिती तथा तक्रार मिळाली आहे असे सांगितले. चौकशी करून दोषींवर कारवाई करू. निवडणुकीमुळे राजकीय रंग दिला जात आहे, असेही ते म्हणाले.

माझ्यावरील आरोप राजकीय द्वेषभावनेतून – बोढे

मी साखरवाही येथील जनता विद्यालयात मागील १७ वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शाळेचा निकालही उत्कृष्ट देत आलो आहोत. मात्र, मी घुग्घूस शहर भाजपाचा अध्यक्ष असल्याने राजकीय द्वेषातून घुग्घूस शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजू रेड्डी यांनी केलेले आरोप प्रतिमा मलीन करण्यासाठी आहेत. माझ्याविरूद्ध कुठल्याही पालकांची तक्रार नाही, विद्यार्थ्यांची तक्रार नाही, असे असतांना केवळ राजकीय स्पर्धेतून राजू रेड्डी यांनी केलेले सर्व आरोप निराधार व बिनबुडाचे आहेत, असे विवेक बोढे यांनी सांगितले.