४४ पैकी फक्त तीनच चांगली

नागपूर  : नागपूर सुधार प्रन्यासकडून महापालिकेला हस्तांतरित केलेल्या ४४ पैकी ३ उद्यानांचीच स्थिती चांगली आहे. इतर ४१ उद्याने अत्यंत वाईट स्थितीत आहेत. विशेष म्हणजे या उद्यानावर गेल्या दोन वर्षांत कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले आहे.  नागपूर सुधार प्रन्यासद्वारे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या उद्यानांच्या प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी महापालिकेने स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन  केली होती. समितीने त्यांचा अहवाल गुरुवारी महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे सादर केला. त्यात उद्यानाबाबतचे वास्तव पुढे आले. नासुप्रच्या मोठय़ा उद्यानातील स्कल्पचर व म्यूरलचे नविनीकरण करणे, कारंज्याची दुरुस्ती, नूतनीकरण, योगाशेडची दुरुस्ती, रंगरंगोटी, विद्युत व्यवस्था नूतनीकरण करणे आवश्यक असल्याचेही समितीद्वारे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या सर्व उद्यानांमध्ये देखभालीचा अभाव असून या उद्यानांच्या नव्याने देखभालीच्या निविदा बोलावणे आवश्यक असून नूतनीकरणावर येणाऱ्या खर्चास सुधारित अर्थसंकल्पात ते ठेवण्यात यावे, असा अभिप्राय स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी अहवालात दिला आहे.

navi mumbai illegal nursery marathi news
नवी मुंबई: कारवाईनंतरही रोपवाटिका उभी, एनआरआय परिसरात डीपीएस शाळेजवळील भूखंडावर पुन्हा अतिक्रमण
concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!

नासुप्रकडून हस्तांतरित उद्यानांची देखभाल ५ जुलै २०२० पासून नागपूर सुधार प्रन्यासद्वारे बंद केली. नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता महापालिकेने ८ सप्टेंबर २०२१ ला ही उद्याने हस्तांतरित करून घेण्यास मंजुरी दिली. ६ जुलै २०२० ते आतापर्यंत उद्यानांमध्ये झालेल्या देखभालीचा खर्च, नूतनीकरणावरील खर्च आणि सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर झालेला खर्च महापालिकेने नागपूर सुधार प्रन्यासकडून घेण्याची शिफारश समितीद्वारे करण्यात आली आहे. 

अहवालात काय? 

४४ उद्यानांपैकी ३ उद्यानांमध्ये किरकोळ स्थापत्य कामांची गरज असून २० उद्यांनांमध्ये पायवाट दुरुस्ती, कम्पाउंड दुरुस्ती, रंगरंगोटीची कामे आणि २१ उद्यानांमध्ये सुरक्षा िभतीचे बांधकाम, पायवाटेचे नूतनीकरण ड्रेनेज लाईन टाकणे, जलवाहिनी टाकणे आदी कामे शिल्लक आहेत. याशिवाय अस्तित्वात असलेल्या गार्डरुम, प्रसाधनगृह व इतर काही ठिकाणी नूतनीकरण करण्यास सर्व उद्यानातील खेळणी, ग्रीन जिम दुरुस्त करून नवीन साहित्य उपलब्ध करण्याची गरज आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.