बुलढाणा : अमरावती, अकोलासह बुलढाणा जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून झालेल्या मुसळधार पावसाने पूर्णा नदी काठोकाठ भरून वाहत आहे. एरवी उन्हाळ्यात कोरडी राहणारी पूर्णामाय पुरासारखी भरून वाहत असल्याने काठावरील विविध गावातील नागरिक सुखावले आहे.

जिल्ह्यातील शेगाव, जळगाव जामोद तालुक्यातून वाहणारी ही नदी पुढे जाऊन जळगाव जिल्ह्यातील चांगदेव या तीर्थस्थळी तापी नदीला मिळते. शेगाव-वरवट मार्गावरील मनसगाव शिवार परिसरात आज, बुधवारी (दि.३) काठोकाठ भरून जाणारी पूर्णा नदी पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे दिसून आले.

हेही वाचा – वर्धा : वाळू तस्करीला आळा बसणार! शासनमान्य ‘स्वस्त वाळूचे दुकान’ उघडणार, निविदांवर सर्वांचे लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यप्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात वाहणारी ही नदी तापी नदीची मुख्य उपनदी आहे. अमरावती, अकोला जिल्ह्यातून ती बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करते. अमरावती व अकोला जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पडणाऱ्या धो-धो पावसामुळे नदी तुडुंब भरून वाहत आहे.