बुलढाणा : शीर्षक वाचून (डाक विभाग कर्मचारी सोडून) कुणीही बुचकळ्यात पडणार हे उघड आहे. पण हे सत्य असून तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, पोस्टमन दादाला भेटल तरी चालेल बरं का..

याचे कारणही तसेच आहे. जिल्ह्यात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी डाक विभागाकडे सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. यासाठी इच्छुक घरमालकाकडे वीज देयक आणि सोलर पॅनल लावण्यासाठी आवश्यक जागा वा छत आवश्यक आहे. नागरिकांची सदर माहिती पोस्टमन दादा निर्धारित अर्जात भरून घेणार आहे. पुढील कारवाई साठी ही माहिती केंद्र शासनाकडे मोबाईलमधून पोहचविण्याचे काम डाक विभाग करणार आहे.

हेही वाचा…खासदार नवनीत राणा यांना पुन्‍हा जिवे मारण्‍याची धमकी; पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यातील पोस्टमन व ग्राम डाक सेवक हे सर्वेक्षण करणार आहे. डाक विभागाची विश्वसनीयता, अगदी दुर्गम भागातही असलेले जाळे व सर्व स्तरातील नागरिकांशी असलेले संबंध लक्षात घेता या सर्वेक्षणसाठी डाक विभागाची निवड करण्यात आली आहे. डाक अधीक्षक गणेश अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वेक्षणाला प्रारंभ झाला आहे.