बुलढाणा : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल लक्षवेधी ठरला. राजकारणी ते सामान्य नागरिकांसाठी खमंग (संतप्त) चर्चेचाही विषय ठरला. याला ‘सोशल मीडिया’ अपवाद ठरला नाही.

निकालानंतर सोशल मीडियावर अनेक ‘पोस्ट्स, मिम्स, कमेंट्स’ चा खच पडला. आजच्या निकालाचे क्रिकेटच्या भाषेत आणि अगदी मोजक्या शब्दात अचूक वर्णन करण्यात आले आहे.

फेसबुकवरील या पोस्टमध्ये, थोडक्यात…

एकनाथ शिंदे क्लीन बोल्ड,

पण ठाकरे यांचा नो बॉल…

आता फ्री हिट…

‘अध्यक्षांकडे’

असे निकालाचे वर्णन करण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या पोस्टला मोठ्या संख्येने लाईक्स, कमेंट्स मिळत आहेत. राजकारण व क्रिकेटप्रेमींकडून ही पोस्ट मोठ्या संख्येने ‘शेअर’ केली जात असून तुफान वेगाने ‘व्हॉयरल’ होत आहे.