आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी नागपूरमधील पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधलाय. मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन तोगडीया यांनी भाजपाला सुनावलं आहे. संपूर्ण देशात मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत अशी मागणी करतानाच भाजपाने त्यांची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्येही विनंती करुन मशिदींवरील भोंगे हटवावेत असं महाराष्ट्रामधील भोंगेविरोधी आंदोलनासंदर्भात बोलताना म्हटलंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: BJP युपीसहीत एकूण १८ राज्यांमध्ये सत्तेत पण एकाही राज्यात भोंग्यांवर बंदी नाही; गुजरातमध्ये तर न्यायालयाने…

“भोंगे हटवण्याची मोहीम सुरु केली आहे. भोंगे आजचे नाहीत अनेक वर्षांपासूनचे आहेत. महाराष्ट्रामध्ये भाजपाचं सरकार होतं तेव्हा सुद्धा भोंगे होते.
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलाय की रात्री १० नंतर आणि सुर्योदयाआधी भोंगे वाजवू नयेत. सर्वोच्च न्यायालयाचा आदर करणं हे सर्व राज्य सरकारांना बंधनकारक आहे,” असं तोगडीया म्हणाले.

तसेच पुढे बोलताना, “मी माझे दिर्घकालीन सहकारी आणि भाजपाच्या बंधूंना विनंती करेन की तुमचं जेव्हा सरकार होतं तेव्हा तुम्ही भोंगे हटवले नाहीत. आता भोंगे हटवल्याचं समर्थन करताय ही चांगली गोष्ट आहे. तेव्हा चांगलं काम करण्याची इच्छा झाली नाही आता होतेय ही चांगलीच गोष्ट आहे,” असा टोला तोगडीयांनी महाराष्ट्र भाजपाला लगावला आहे.

नक्की वाचा >> “रशिया युक्रेनमध्ये घुसू शकतो तर PoK आपल्या बापाचं आहे, सरकार स्वयंसेवकांचं आहे; मोहन भागवत यांनी स्वत: टँकमध्ये बसून…”

पुढे बोलताना तोगडीयांनी भाजपाशासित राज्यांमधील भोंग्यांबद्दलही आठवण करुन दिलीय. “मात्र भाजपाच्या सर्व बांधवांना सांगू इच्छितो सर्वात आधी जेथे जेथे देशात भाजपाची सत्ता आहे त्या राज्यांमध्ये विनंती करुन आधी भोंगे हटवा. महाराष्ट्रात आंदोलन सुरु ठेवा पण मध्य प्रदेशात भोंगे हटवणार नाही. गुजरातमध्ये भोंगे हटवणार नाही पण महाराष्ट्रात आंदोलन करणार. हे योग्य नाही,” असं तोगडीया म्हणालेत. “दुसरा माझा सल्ला आहे की सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे तर केंद्र सरकारने प्रत्येक जिल्हाधिकारी, न्यायदंडाधिकारी तसेच पोलीस निरिक्षकांना भोंगे हाटवण्याचे आदेश देण्याचे अधिकार आहेत,” असंही तोगडीया म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझे सहकारी, मी आता नाव नाही घेणार पण हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर माझ्यापेक्षाही जास्त जोमाने सध्या काम करणाऱ्यांनी केंद्र सरकारकडून ४८ तासांमध्ये तुम्ही डीएम, एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे आदेश द्या. असं केल्यास भोंग्याचा प्रश्न निकाला लागेल. भाजपाची सरकार असताना भोंगे हटवण्याबद्दल बोलणार नाही दुसऱ्यांचं सरकार असताना मागणी करणार तर हे वाईट दिसतं. मला आनंद झाला आधी केवळ मीच काम करायचो आता सगळेच करु लगालते,” असंही तोगडीया म्हणाले.